'रसोडे में कोन था', 'पावरी हो रही' या गाण्यांमुळे तरुणांच्या गळ्यातील ताईत झालेल्या यशराज मुखाटेचं नाव काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामी सोबत जोडलं गेलं.
यशराज मुखाटेला सोशल मीडियावर 'तुझी आवडती अभिनेत्री कोण?' असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्याने प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचं नाव घेतलं.
ही अभिनेत्री म्हणजेच वैदेही परशुरामी. आणि त्यानंतरच हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होऊ लागल्या.
लोकमत फिल्मी या कार्यक्रमात तिला यशराजबद्दल प्रश्न विचारल्यावर ती असं म्हणाली, 'मी एकदाच त्याला एक कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटली आहे.'
ती पुढे म्हणाली, 'आमच्यात फक्त एक संवाद झाला होता तो म्हणजे कामाबद्दल मी त्याला सांगितले की मला तुझे काम आवडते. माझं नाव यशराज मुखातेबरोबर लिंक झाल्याने मला आनंद झाला आहे. मी त्याच्या प्रेमात नाही मी त्याला ओळखत ही नाही.' असा खुलासा तिने केला आहे.
अभिनेत्री वैदेही परशुरामीनं आपल्या अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांच्या मनात घर बनवलं आहे. वैदेहीनं अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांत भूमिका साकारत आपला एक वेगळा असा चाहता वर्ग निर्माण केला आहे.