मुंबई, 07 फेब्रुवारी : राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एवढे दिवस तिने लग्न केल्याची चर्चा रंगली होती. पण आता लग्न मोडल्याची चर्चा आहे. तिने मीडियासमोर येत पती आदिल खान दुर्रानीवर गंभीर आरोप केले होते. तिने 8 महिन्यांपूर्वी आदिलशी लग्न केले होते. आता तिने असा दावा केला की आदिलचे तीन मुलींसोबत प्रेमसंबंध असल्याने त्याने तिला लग्न लपवण्यास भाग पाडले. त्याच्या गर्लफ्रेंडची माहिती सुद्धा राखीने मीडियाला सांगितली आहे. राखीने पती आदिल खानवर विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप ठेवत तक्रार दाखल केली होती. आता अदिलविषयी मोठी बातमी समोर येत आहे. राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानीला ओशिवरा पोलिसांनी आज दुपारी अटक केली. सोमवारी रात्री राखीने आदिलविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. मीडिया रिपोर्टनुसार मंगळवारी आदिलला राखीच्या घरातूनच अटक करण्यात आली. राखीने पती आदिल खानवर विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप ठेवत ही तक्रार दाखल केली होती. राखीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आदिलला अटक केली. राखीने पती आदिलच्या गर्लफ्रेंडबद्दलही खुलासा केला होता. हेही वाचा - Rakhi Sawant: राखीच्या सवतीचा फोटो आला समोर; आता अदिलसोबतचा संसार कायमचा मोडणार? राखीने आदिलवर गंभीर आरोप केले होते. सोमवारी तिचे काही व्हिडिओही व्हायरल झाले होते, ज्यामध्ये राखीने आदिलवर हे आरोप केलेत. पोलिसात तक्रार दाखल करण्याआधी तिने माध्यमांना सांगितलं की, ‘आदिलने तिच्याच घराच्या चाव्या तिच्याकडून हिसकावून घेतल्या आणि त्या देण्यासाठी तो नकार देतोय.’ तसंच आदिल तिला त्रास देतो’ असाही आरोप तिने केला. ‘बॉलिवूडमध्ये नाव मिळवण्यासाठी त्याने माझा वापर केला,’ असा राखीचा आरोप आहे. तिच्याकडील पैसे आणि सोनेही त्याने घेतल्याचा राखीचा दावा आहे. राखीच्या तक्रारीनंतर आदिलला अटक करण्यात आली.
राखीने आदिलवर फसवणूक आरोप केले आहेत. चार लाख रुपये अन् सोनं घेऊन पळाल्याचा आरोप राखीनं आदिलवर केला आहे. त्याचप्रमाणे आदिल खान याचे तनु चंदेल हिच्यासोबत अफेअर असल्याचा आरोपही केलाय. त्याशिवाय आदिलसोबत घटस्फोट घेणार असल्याचं राखीनं सांगितलं.
राखी सावंतचा इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. यामध्ये राखी सावंत आदिल खान याच्यावर आरोप करत आहे. मोठ मोठ्यानं रडत अन् ऊर बडवत राखी आदिलवर गंभीर आरोप करत आहे. आदीलने आतापर्यंत जवळपास एक कोटी रुपये अन् घरातील सामान चोरी केल्याचा आरोपही राखीनं केलाय. आता त्याच प्रकरणात अदिलाला पोलिसांनी अटक केली आहे.