मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

राखी सावंतची अनोखी भेट; दिशा-राहुलला दिलं हे लाखोंचं गिफ्ट

राखी सावंतची अनोखी भेट; दिशा-राहुलला दिलं हे लाखोंचं गिफ्ट

तिने या दोघांना कायम स्मरणात राहील असं एक गिफ्ट दिलं आहे. या गिफ्टचा व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

तिने या दोघांना कायम स्मरणात राहील असं एक गिफ्ट दिलं आहे. या गिफ्टचा व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

तिने या दोघांना कायम स्मरणात राहील असं एक गिफ्ट दिलं आहे. या गिफ्टचा व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 18 जुलै: बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत (Rakhi Sawant) आपल्या वादग्रस्त आणि चित्रविचित्र विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. (Rakhi Sawant Video viral) मात्र यावेळी ती तिने दिलेल्या एका महागड्या गिफ्टमुळे चर्चेत आहे. राखीने अलिकडेच राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. (Rahul Vaidya Disha Parmar marriage) तिने या दोघांना कायम स्मरणात राहील असं एक गिफ्ट दिलं आहे. या गिफ्टचा व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

बिग बॉस १४ फेम राहुल वैद्य आणि त्याची गर्लफ्रेण्ड दिशा परमार यांचा विवाहसोहळा अखेर पार पडला. या विवाह सोहळ्याला मनोरंजनसृष्टीतील अनेक नामांकित कलाकारांनी हजेरी लावली होती. परंतु यापैकी राखी सावंतने मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं. तिने दिशाला चक्क हिऱ्यांचा नेकलेस भेट म्हणून दिला आहे. या नेकलेसची किंमत जवळपास 5 लाख रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. राखीनं वृत्तमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत हा नेकलेस दाखवला. तिच्या सर्व चाहत्यांतर्फे ही भेटवस्तू ती विवाहित जोडप्याला देणार असं म्हणाली.

Minissha Lamba दुसऱ्यादा पडली प्रेमात; पतीला घटस्फोट दिल्यानंतर बिझनेसमॅनला करतेय डेट

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

‘हा तर दैवी चमत्कार’; शिल्पा शेट्टीची विनंती, कृपया हा Video करा व्हायरल

राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्यात अनेक वर्षांपासून मैत्री होती. मात्र ‘बिग बॉस’ च्या 14 व्या पर्वात राहुलने दिशा परमारला प्रपोज केलं होतं. यावर दिशा परमारने देखील तिचा होकार दिला होता. राहुलने दिशाच्या वाढदिवसाच्या दिवशी एका पांढऱ्या रंगाच्या टीशर्टवर लिपस्टिकने ‘माझ्याशी लग्न करशील का’ असं लिहित टेलिव्हिजनवरून दिशाला प्रपोज केलं होतं. त्यानंतर व्हॅलेंटाइन्स डेला शोमध्ये येऊन दिशाने राहुलच्या प्रपोजला होकार दिला होता.

First published:

Tags: Big boss, Rakhi sawant, Video viral