जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘हा तर दैवी चमत्कार’; शिल्पा शेट्टीची विनंती, कृपया हा Video करा व्हायरल

‘हा तर दैवी चमत्कार’; शिल्पा शेट्टीची विनंती, कृपया हा Video करा व्हायरल

‘हा तर दैवी चमत्कार’; शिल्पा शेट्टीची विनंती, कृपया हा Video करा व्हायरल

प्रतीती, श्वेता आणि साधवी यांनी अद्भूत नृत्यप्रदर्शन करत सर्वांनाच चकित केलं. त्यांचा हा व्हिडीओ जास्तीत जास्त व्हायरल करा अशी विनंती खुद्द शिल्पा शेट्टीनं (Shilpa Shetty) केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 18 जुलै**:** सुपर डान्सर हा छोट्या पडद्यावरील सध्याचा सर्वाधिक चर्चेत असलेला डान्स शो आहे. (Super Dancer - Chapter 4) या शोचं चौथं पर्व सुरु आहे. दर आठवड्याला यामधील स्पर्धक एकाहून एक सरस अशा नृत्यांचं प्रदर्शन करतात. कोण कोणापेक्षा चांगला डान्स करतो हे सांगणं आता परिक्षकांनाही जड जाऊ लागलं आहे. यावरुनच स्पर्धकांच्या कौशल्याचा अंदाच आपल्याला येतो. (Super Dancer dance video) परंतु या आठवड्यात मात्र सर्वोत्तम डान्सर निवडणं परिक्षकांना कठीण गेलं नाही. कारण प्रतीती, श्वेता आणि साधवी यांनी अद्भूत नृत्यप्रदर्शन करत सर्वांनाच चकित केलं. त्यांचा हा व्हिडीओ जास्तीत जास्त व्हायरल करा अशी विनंती खुद्द शिल्पा शेट्टीनं (Shilpa Shetty) केली आहे. प्रतीती, श्वेता आणि साधवी यांनी केलेल्या या अॅक्टला तीन देवीया असं नाव देण्यात आलं. त्यांनी आपल्या नृत्यातून रामायणातील विविध कशा सांगितल्या. कशा प्रकारे लक्ष्मण रावणाची बहिण शूर्पणखेचं नाक कापतो. सीतेचं हरण कसं केलं जातं. अशा कथा या नृत्यातून सांगितल्या गेल्या. त्याचं हे नृत्य पाहून सर्व परिक्षक भारावून गेले. हे तर दैवी नृत्य होतं असं म्हणत त्यांनी तीन्ही स्पर्धकांचं तोंड भरून कौतुक केलं. बापरे! Hair Transplant साठी संजय जाधवनं खर्च केले इतके लाख

जाहिरात

प्रियांका चोप्रानं 20 वर्षात जमवली इतकी संपत्ती; आकडा बघून तुम्हालाही बसेल शॉक या आठवड्याच्या भागात प्रसिद्ध रॅपर बादशाह पाहूणा कलाकार म्हणून आला होता. त्याने देखील या तीन मुलींचं नृत्य कौशल्य पाहून आश्चर्य व्यक्त केलं. तुम्ही प्लीज या अॅक्टचं सादरीकरण जगभरात करा. खरं तर मी लाईव्ह शोसाठी फारसे पैसे खर्च करत नाही. पण तुमचा हा अॅक्ट मी तिकिट काढून नक्की पाहिन. त्याच्या या कौतुकानंतर परिक्षक शिल्पा शेट्टीनं देखील या नृत्याचा व्हिडीओ जितका होईल तितका व्हायरल करा अशी विनंती आपल्या चाहत्यांना केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात