मुंबई 18 जुलै**:** आपल्या ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री मिनिषा लांबा (Minissha Lamba) गेली काही वर्ष बॉलिवूडपासून दूर आहे. मात्र खासगी आयुष्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. सध्या ती दिल्लीतील एका व्यवसायिकाला डेट करत असल्याची चर्चा आहे. (Minissha Lamba dating businessman) तिनं आपल्या या नव्या मित्रासोबतचा एक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Minissha Lamba Photo viral) या फोटोमुळे मिनिषा पुन्हा एकदा प्रेमात पडली की काय? असा सवाल चाहते करत आहेत. मिनिषानं अगदी वर्षभरापूर्वीच पती रयान थामसोबत घटस्फोट घेतला होता. तेव्हापासून ती दिल्लीतील एका बिझनेसमॅनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या बाहेर पडू लागल्या. या व्यवसायिकाचं नाव आकाश मलिक असं आहे. यापूर्वी मिनिषाला याबद्दल विचारलं असता तिनं उत्तर देणं टाळलं होतं. परंतु आता मात्र तिने स्वत: आकाशसोबत डिनर करतानाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत एकच खळबळ उडवून लावली आहे. रिपोर्टनुसार मिनिषा आणि आकाश 2019 साली एका पोकर चॅम्पियनशिपच्या वेळी भेटले होते. पण त्याचा फिल्म इंडस्ट्रीशी कोणताही संबंध नाही. ‘हा तर दैवी चमत्कार’; शिल्पा शेट्टीची विनंती, कृपया हा Video करा व्हायरल
ना अमिताभ ना शाहरुख; ऐश्वर्या केवळ या एकाच अभिनेत्याला इन्स्टावर करते फॉलो कोण आहे मिनिषा लांबा**?** एकेकाळी मिनिशा लांबा ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. खरं तर तिला अभिनयात फारशी गती नव्हती पण तिच्या ग्लॅमरस आणि मादक अदा पाहून चाहते घायाळ होत असतं. तिनं 2005 ते 2014 असा दिर्घ काळ बॉलिवूडमध्ये संघर्ष केला. परंतु तरी देखील तिच्या वाट्याला म्हणावे तसे सुपरहिट चित्रपट आले नाहीत. प्लॉप चित्रपटांमुळं तिच्यावर फ्लॉप अभिनेत्रीचा शिक्का मारण्यात आला. तिला काम मिळानासं झालं परिणामी तिनं बॉलिवूड पासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.