मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Rakhi Sawant: हिजाब घातला, रोजा ठेवला; संतापलेले नेटकरी राखीला म्हणाले 'कधी 16 सोमवारचं व्रत पण...'

Rakhi Sawant: हिजाब घातला, रोजा ठेवला; संतापलेले नेटकरी राखीला म्हणाले 'कधी 16 सोमवारचं व्रत पण...'

राखी सावंतने हिजाब घालून शेअर केला व्हिडीओ

राखी सावंतने हिजाब घालून शेअर केला व्हिडीओ

राखीला चाहत्यांकडून सुद्धा कायम पाठींबा मिळतो. राखी सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. आता तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यावरून तिला नेटकरी ट्रोल करत आहेत. काय आहे या व्हिडिओत नक्की जाणून घ्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 24 मार्च : राखी सावंत हे नाव कायम चर्चेत असतं. या ना त्या कारणामुळे राखी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत असते. मागच्या काही दिवसात तिच्या संसारात वादळ निर्माण झालं आहे. राखीचा नवरा आदिल सध्या तुरुंगात आहे. तर राखीनेही आता नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तिने दुबईत डान्स आणि अभिनयाची अकादमी सुरु केली आहे. राखीला चाहत्यांकडून सुद्धा कायम पाठींबा मिळतो. राखी सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. आता तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यावरून तिला नेटकरी ट्रोल करत आहेत. काय आहे या व्हिडिओत नक्की जाणून घ्या.

रमजान महिना आजपासून सुरू झाला आहे. मुस्लिम समाजातील लोक महिनाभर रोजा ठेवतात आणि अल्लाहची पूजा करतात. आदिल खान दुर्राणीशी लग्न केल्यानंतर राखीनेही इस्लाम धर्म स्वीकारला आणि आता ती फातिमा झाली आहे, त्यामुळे तिने पहिला रोजा केला तसंच नमाज पठणही केले. तिने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना ही  माहिती दिली आहे. रोजा धरण्याविषयी सांगताना राखी म्हणाली कि, सकाळी सेहरी केल्यानंतर तिला भूकही लागत नाही आणि तिला खूप छान आणि ताजतवानं झाल्यासारखं वाटत आहे.' मात्र, यामुळे राखी  नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.

Aamir Khan Son: आमिरच्या लेकाचं चित्रपट सृष्टीत पदार्पण; 'या' सुपरहिट तमिळ चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार जुनैद

राखी सावंतने तिचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात तिने गुलाबी रंगाचा हिजाब परिधान केलेला दिसत आहे. ती म्हणते, 'सलाम वालीकुम सर्वांना. हा माझा पहिला उपवास आहे. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, ४ वाजता उठल्यावर मला अजिबात भूक लागत नाही. आणि मी नमाज पण वाचत आहे. मला खूप छान आणि ताजतवानं झाल्यासारखं वाटत आहे, मी आता अधिक शिकत आहे.'

राखी सावंतने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ती रमजानच्या शुभेच्छा देत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले कि, 'अल्ला मी तुझ्यावर प्रेम करते. मला मदत करा हा माझा पहिला रमजान आहे. अल्लाह मला मदत करा. मला कसे माहित नाही, पण मी एकटीच करेन. एल्ला अल्लाहू अकबर.' असं राखीने म्हणलं आहे.यावर राखी सावंतला नेटकरी ट्रोल करत आहेत. त्यांनी तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिला  16 सोमवार करण्याचा सल्ला दिला आहे. तर राखीने धर्म बदलला त्यावरूनही तिला नेटकरी ट्रोल करत आहेत.

राखी सावंतने आदिल खान दुर्रानीसोबत लग्न केले आणि या खुलाशामुळे तिच्या आयुष्यातील अडचणी वाढत गेल्या. गेले काही महिने त्याच्यासाठी चढ-उतारांनी भरलेले आहेत. त्यांनी आदिलवर अनेक आरोप केले. पण आजही ती म्हणते की ती पाच वेळा नमाज अदा करते आणि तिला उमराही करायची आहे.

First published:
top videos

    Tags: Rakhi sawant