जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / राखी सावंत झाली युगांडाची राजकन्या अन् खरेदी केलं हेलिकॉप्टर, कशासाठी ते जरा पाहा...

राखी सावंत झाली युगांडाची राजकन्या अन् खरेदी केलं हेलिकॉप्टर, कशासाठी ते जरा पाहा...

राखी सावंत झाली युगांडाची राजकन्या अन् खरेदी केलं हेलिकॉप्टर, कशासाठी ते जरा पाहा...

ड्रामा क्वीन (Drama Queen) म्हणून प्रसिद्ध असणारी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) सतत आपल्या बिनधास्त वागण्या-बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असते.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 28 फेब्रुवारी- ड्रामा क्वीन (Drama Queen) म्हणून प्रसिद्ध असणारी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) सतत आपल्या बिनधास्त वागण्या-बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असते. प्रसिद्धीच्या झोतात येण्याची एकही संधी ती सोडत नाही. कधी राजकीय परिस्थिती, राजकीय नेते यांच्याबाबत विधानं करून तर कधी बॉलिवूडबाबत, कलाकारांबाबत विधानं करून ती सर्वाचं लक्ष वेधून घेत असते. सध्या काही दिवसांपासून तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होती. राखीने ‘बिग बॉस 15’ मध्ये (Big Boss  15) तिच्या पतीची रितेशची (Ritesh) संपूर्ण देशाला ओळख करून दिली होती. मात्र ‘व्हॅलेंटाइन डे’च्या (Valentine Day) आधीच तिनं रितेशपासून आपण वेगळे झालो असल्याचं जाहीर केलं. हे प्रकरण शांत होतं न होतं तोच आता राखीचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ती आपण युगांडाची राजकुमारी (Princess of Uganda) असल्याचे सांगत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून लोक राखीच्या या अवताराची चांगलीच खिल्ली उडवत आहेत. या व्हिडिओमध्ये राखी सावंतने एखाद्या राजकुमारीसारखा पोशाख केलेला दिसत आहे. ती एका खासगी हेलिकॉप्टरमधून (Helicopter) खाली उतरताना दिसत आहे. तिने पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला असून, डोक्यावर हॅट घातली आहे. डोळ्यावर काळा गॉगल आहे. एखाद्या राजकन्येसारखाच तिचा हा वेश असून, हेलिकॉप्टरमधून तिनं मोठ्या दिमाखात एंट्री घेतली आहे. हे हेलिकॉप्टर आपण खरेदी केल्याचा दावा राखी सावंतने या व्हिडिओमध्ये केला आहे. चॉपर राईडदरम्यान ती आपण युगांडाची राजकुमारी असल्याचं सांगताना या व्हिडिओत दिसत आहे. डेलना पूनावालानं आयोजित केलेल्या एका डर्बीसाठी राखीने अशी उपस्थिती लावली होती.

    जाहिरात

    या व्हिडिओत राखी म्हणत आहे की, हेलिकॉप्टरमधून प्रवास करताना खूप मजा आली. मला वाटतेय की मी राजकन्याच आहे. कुठली आहे माहीत नाही? पण चला, मी युगांडाची राजकन्या आहे. तिचा एकूणच सगळा नाटकी अविर्भाव बघून चाहत्यांनीही तिची थट्टा करायला सुरुवात केली आहे. या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी हसणारे इमोजी टाकले आहेत. एका चाहत्याने तिला नाटकी असं संबोधलं असून, एका युझरनं तिला ‘लोखंडवाला’ची प्रिन्सेस म्हटलं आहे. एकाने तर ‘फिर आ गयी’ असं म्हटलं आहे, तर एकाने तिला चक्क वर्क फ्रॉम होमची ऑफर दिली आहे. एकानं राखी सावंत म्हणजे फुल्लं मनोरंजन असं म्हटलं आहे. या व्हिडिओला 36 हजारपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. वाचा- PHOTOS : ‘नमस्ते मेरा नाम है मोनिका…’ कशी वाटली झुंडमधील आर्ची? नुकताच राखी सावंतने पंतप्रधान मोदींसाठी (PM Narendra Modi) एक संदेश देत लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. या व्हिडिओमध्ये ती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानताना आणि देशाचा जयघोष करताना दिसत होती. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून हे दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत. युक्रेनमध्ये काही भारतीय मुलं आणि कुटुंबं अडकली आहेत ही चिंतेची बाब आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी पंतप्रधानांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, त्याबद्दल राखीने त्यांचे आभार मानले आहेत. तिच्या या व्हिडिओमुळे ती चर्चेत असताना हा नवा व्हिडिओ सर्वांचे मनोरंजन करत आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात