PHOTOS : 'नमस्ते मेरा नाम है मोनिका...' कशी वाटली झुंडमधील आर्ची?
सैराट फेम रिंकू राजगुरू झुंड या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमातील तिचा पहिला वहिला लुक समोर आला आहे.
|
1/ 8
नागराज मंजुळे यांच्या झुंड या चित्रपटात रिंकू राजगुरू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
2/ 8
झुंड सिनेमातील आर्चीचा लुक सध्ये सोशल मीडियावर चर्चेत आहे. झुंड या चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये रिंकूची झलकही पाहायला मिळतेय.
3/ 8
रिंकू राजगुरूने तिचे काही फोटो शेअर करत म्हटलं आहे की, नमस्ते मेरा नाम है मोनिका. तिच्या या लुकवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.
4/ 8
झुंड या सिनेमात रिंकू मोनिकाची भूमिका साकारताना दिसते. तिचा हा झुंडमधील लुक काहीसा खेड्यातील तरूणींशी मिळणार आहे. काहीशी सावळी ...उन्हाची झळा सोसलेली अशी काहीशी रिंकू या लुकमध्ये दिसत आहे.
5/ 8
या लुकमधील रिंकुचे कपडे असतील किंवा तिच्या माथ्यावरील गोंदन लक्षवेधून घेत आहे.
6/ 8
झुंड हा नागराज मंजुळे यांचा पहिला हिंदी चित्रपट असून यामध्ये अमिताभ बच्चन यांची देखील प्रमुख भूमिका आहे.
7/ 8
झुंडमध्ये रिंकूसोबत सैराटमध्ये परश्याची भूमिका साकारणारा आकाश ठोसरही दिसणार आहे.