मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Me Too: ‘दिग्दर्शकाला मांड्या आणि क्लिवेज पाहायचं होतं’;आश्रम फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Me Too: ‘दिग्दर्शकाला मांड्या आणि क्लिवेज पाहायचं होतं’;आश्रम फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

सिनेसृष्टीत अभिनेत्रींसोबत मोठ्या प्रमाणावर लैंगिक गैरव्यवहार केला जातो. हा धक्कादायक अनुभव आजवर अनेक नामांकित अभिनेत्रींनी सांगितला आहे.

  • Published by:  Mandar Gurav
मुंबई 1 जुलै: सिनेसृष्टीत अभिनेत्रींसोबत मोठ्या प्रमाणावर लैंगिक गैरव्यवहार केला जातो. हा धक्कादायक अनुभव आजवर अनेक नामांकित अभिनेत्रींनी सांगितला आहे. (Me Too movement) काहींनी तर निर्माते आणि दिग्दर्शकांविरोधात पोलीस तक्रार देखील केली. या यादीत आता अभिनेत्री प्रीती सूद (Preeti Sood) हिचं देखील नाव जोडलं गेलं आहे. तिनं देखील तिच्यासोबत घडलेला कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला. (Casting couch in bollywood) ‘आश्रम’ या वेब सीरिजमधून नावारुपास आलेल्या प्रीतीनं ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं तिच्यासोबत घडलेला तो धक्कादायक प्रसंग सांगितला. ती म्हणाली, “ऑडिशनमध्ये अनेकदा तिच्याबाबत अश्लील वक्तव्य केली जायची. अन् याचा विरोध करताच मला तो रोल नाकारला जायचा. अर्थात यासाठी कारण देखील फारच विचित्र दिली जायची. कधी तुम्ही खूप लहान आहात तर कधी तुम्ही खूप मोठ्या. एका चित्रपटातून तर मला शेवटच्या मिनिटांमध्ये काढण्यात आलं कारण मी मुख्य अभिनेत्रीपेक्षा अधिक सुंदर दिसत होते.” रेखा ते लीला चंदावरकर... तरुणपणीच विधवा झाल्या या बॉलिवूड अभिनेत्री यानंतर तिनं कास्टिंग काऊचबाबत देखील अनुभव सांगितला. ऑडिशनमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर दिग्दर्शकानं तिला भेटण्यासाठी बोलावलं होतं. तिची व्यक्तिरेखा समजावून सांगण्यासाठी ही मिटिंग आयोजित करण्यात आली होती. पण दिग्दर्शक चित्रपटाबद्दल काहीच बोलत नव्हता. तो तिच्या कपड्यांबाबत तिला सतत विचारत होता. तिनं एक्स्पोज करणारे कपडे घालावे. शिवाय तिनं आपली मांडी आणि क्लिवेज दाखवावे अशी देखील मागणी तिच्याकडे केली गेली. त्यानंतर ती तडक तेथून निघून गेली. हा अनुभव आल्यापासून ती अगदी सावधपणे ऑडिशन देते.
First published:

Tags: Bollywood actress, Entertainment, Hollywood, Movie shooting

पुढील बातम्या