मुंबई, 26 जून : प्रसिद्ध कॉमेडियन राजपाल यादव गेली वर्षानुवर्षे प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. देशातील काही मोजक्या विनोदी कलाकारांमध्ये त्याचा समावेश होतो. पण तुम्हाला माहित आहे का की त्याचे वैयक्तिक आयुष्य संघर्षमय राहिले आहे. सगळ्यांना हसवणाऱ्या राजपाल यादवने आयुष्यात आजवर खूप दुःख सोसलं आहे. अभिनेत्याचे पहिले लग्न करुणा नावाच्या महिलेशी झाले होते. नुकतंच एका मुलाखतीत तो फक्त 20 वर्षांचा असताना त्याच्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूचा त्याने कसा सामना केला याविषयी खुलासा केला आहे. आपल्या पहिल्या बायकोविषयी बोलताना राजपाल यादव भावुक झालेला पाहायला मिळाला. ‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत, राजपाल यादवने सांगितलं की, तो जेव्हा फक्त 20 वर्षांचा होता तेव्हा त्याला आयुष्यात मोठं दुःख झेलावे लागलं. ऑर्डनन्स क्लोदिंग फॅक्टरीत काम करण्यासाठी निवड झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याचं लग्न लावून दिलं होतं. राजपाल म्हणाला, “त्यावेळी जर तुम्ही 20 व्या वर्षी नोकरी करत असाल तर लोक तुम्हाला लग्नासाठी स्थळं पाठवायचे. त्यामुळे माझ्या वडिलांनी माझे लग्न केले. त्यानंतर काही दिवसातच माझ्या पहिल्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला. पण त्यादरम्यानच तिचं निधन झालं.
राजपाल यादव पुढे म्हणाले की, “मला दुसऱ्या दिवशी तिला भेटायचे होते, पण त्यानंतर मी तिचा मृतदेह खांद्यावर घेऊन गेलो होतो. पण माझे कुटुंब, माझी आई, माझ्या वहिनीचे आभार. माझ्या मुलीला असे कधीच वाटले नाही. तिची आई नाही. ती खूप प्रेमात वाढली.” FIR against Vijay: दाक्षिणात्य सुपरस्टार थलपथी विजय विरोधात गुन्हा दाखल; अभिनेत्यावर आहे ‘हा’ आरोप राजपालची पहिली पत्नी करुणा हिचे 1991 मध्ये निधन झाले आणि हा अभिनेतासाठी मोठा धक्का होता. अशा प्रकारे इंडस्ट्रीत आपले नाव प्रस्थापित करण्यासाठी त्याला 13 वर्षे लागली. यादरम्यान त्याने दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये शिक्षण घेतले आणि अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनतर 2000 मध्ये त्याचा ‘जंगल’ चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर 2003 मध्ये त्याने त्यांची दुसरी पत्नी राधासोबत लग्न केलं. एवढंच नाही ते राजपालची दुसरी पत्नी देखील आपल्या सावत्र मुलीचा स्वतःच्या लेकीप्रमाणे सांभाळ करते. याविषयी तो म्हणाला, “माझ्या गुरूंनंतर, माझ्या पालकांनंतर मला १०० टक्के पाठिंबा देणारी एकमेव व्यक्ती म्हणजे माझी पत्नी. राधानेही माझ्या पहिल्या पत्नीच्या आणि माझ्या मुलीला स्वतःचे म्हणून वाढवले. ती आज लखनौमध्ये आनंदी वैवाहिक जीवन जगत आहे, पण याचे श्रेय माझ्या कुटुंबाला आणि पत्नी राधाला जाते. मी काही केले नाही, मी फक्त एक माध्यम आहे.’