मुंबई, 15 डिसेंबर - राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि पत्रलेखा (Patralekhaa) यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. 15 नोव्हेंबर रोजी बॉलिवूड अभिनेता राजकुमारने त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखा हिच्याशी थाटामाटात लग्न केले. आपल्या लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करताना राजकुमारने पत्रलेखासोबतचा काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केवळ चाहतेच नाही तर बॉलीवूडचे सहकारी कलाकारही नवविवाहित जोडप्याचा आनंद साजरा करण्याच्या अनोख्या पद्धतीने प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या दोघांचा पूर्ण ऑन मस्ती मूडमध्ये असलेला फोटो पाहून तुम्ही देखील हसाल.
राजकुमार रावने त्याच्या इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. एकात त्याने स्वतःचा आणि पत्रलेखाच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे, तर दुसऱ्यामध्ये दोघेही चिखलात लोळताना दिसत आहेत. दोघंही चिखलात आणि जमिनीवर पडलेले दिसत असल्याचं या फोटोत दिसत आहे. पत्रलेखा आणि राजकुमार राव यांच्या अंगावरील कपडेही कमी आहेत. हे दोन फोटो शेअर करत राजकुमारने 'प्रेमात बुडून गेलोय' अशी काहीशी कॅप्शनही लिहिली आहे. अभिनेत्याने लिहिले, 'मेरा यार तुम, मेरे प्यार तुम, मेरे दिल भी तुम, दिलदार तुम पत्रलेखा..आपल्या लग्नाला एक महिना झाला आहे.
वाचा; कियारा आडवाणीने खरेदी केली Audi कार, किंमत ऐकून डोळे विस्फारतील
या दोघांचे अनोखे सेलिब्रेशन पाहून बॉलीवूडकर देखीव त्यांच्या प्रेमात पडले
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या या फोटोवर आयुष्मान खुराना, प्रिती झिंटा, हुमा कुरेशी, सिकंदर खेर यांनी हार्ट इमोजी शेअर करत आपले प्रेम व्यक्त केले आहे. तर चाहते अप्रतिम कमेंट्स लिहून अभिनंदन करत आहेत. एकाने लिहिले आहे 'इतके प्रेम भावा', दुसऱ्याने लिहिले आहे की, 'कसे तुम्ही लोक अंघोळ करत आहात' आणि तिसऱ्याने लिहिले 'खूप सुंदर जोडपे'.
राजकुमार राव-पत्रलेखाचे लग्न या वर्षातील चर्चित लग्नांपैकी एक होते. प्रदीर्घ रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. राजकुमार रावच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, 'बधाई दो' आणि 'भोद' हे त्याचे आगामी चित्रपट आहेत. याशिवाय जान्हवी धर्मा प्रोडक्शनच्या 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटात दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment