मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /कियारा आडवाणीने खरेदी केली Audi कार, किंमत ऐकून डोळे विस्फारतील

कियारा आडवाणीने खरेदी केली Audi कार, किंमत ऐकून डोळे विस्फारतील

 बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara advani)सध्या यशाच्या शिखरावर आहे. कियाराने Audi A8L luxury Sedan कार खरेदी केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara advani)सध्या यशाच्या शिखरावर आहे. कियाराने Audi A8L luxury Sedan कार खरेदी केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara advani)सध्या यशाच्या शिखरावर आहे. कियाराने Audi A8L luxury Sedan कार खरेदी केली आहे.

मुंबई, 15 डिसेंबर - बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara advani)सध्या यशाच्या शिखरावर आहे. त्याचवेळी कियाराचे वैयक्तिक आयुष्यही प्रगतीच्या मार्गावर आहे. अभिनेत्रीने तिच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका नवीन कारची भर घातली आहे. कियाराने Audi A8L luxury Sedan कार खरेदी केली आहे. कंपनीने कियाराचे फोटो शेअर केले आहेत. ज्यात अभिनेत्री तिच्या अगदी नवीन ऑडीसोबत दिसत आहे. या आलिशान ऑडी एडिशनची किंमत 1.58 कोटी रुपये आहे.

ऑडीचे हे एडिशन गेल्या वर्षी 2020 मध्ये भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आली होती. त्याची सुरुवातीची किंमत 1.56 कोटी (एक्स-शोरूम) आहे. कियाराने तिची नवीन Audi A8L 1.58 कोटी रुपयांच्या किमतीत घरी आणली आहे. कार कंपनीने फोटो ट्विट केले आहेत.

वाचा : 'तुझ्याकडे फक्त एकच बिकिनी आहे का ?' मालदीव फोटोंमुळे इलियाना ट्रोल

कियाराची ही तिसरी सर्वात महागडी कार आहे. तिच्या लक्झरी कार कलेक्शनमध्ये BMW X5 आणि Mercedes-Benz E-Class, BMW 530d यांचा समावेश आहे. यापूर्वी करण जोहरने ऑगस्टमध्ये ऑडी A8L देखील खरेदी केली होती. आता हे दोन्ही सेलिब्रिटी ऑडीच्या या नवीन एडिशनचे मालक बनले आहेत.

अभिनेत्रीच्या प्रोफेशनल वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कियारा शेवटची शेरशाह चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिनं डिंपल चीमाची उत्तम भूमिका साकारली होती. सिद्धार्थ मल्होत्रासोबतची तिची ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीही खूप आवडली होती. तिच्या आगामी चित्रपटांमध्ये भूल भुलैया २, गोविंदा मेरा नाम, जुग जुग जिओ आणि RC15 यांचा समावेश आहे.

वाचा :अंकिता लोखंडेच्या लग्नात रील बहिणींची धम्माल! 'पवित्र रिश्ता' टीम पुन्हा एकत्र

कियारा आडवाणी(Kiara advani)ने 2014 साली 'फगली' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.  पहिल्या चित्रपटातून तिला फारशी लोकप्रियता मिळाली नाही. मात्र त्यानंतर कियाराच्या यशाचा आलेख उंचावतच गेला आहे. त्यानंतर तिनं अनेक हिट सिनेमे दिले. आता ती बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे.

First published: