मुंबई, 30 जुलै : अभिनेता रणवीर सिंहनं काही दिवसांपूर्वी मुंबईत अपार्मटमेंट खरेदी केला. रणवीरनं करोडो रुपयांचं एक मोठं आलिशान अपार्टमेंट खरेदी केलंय. आता रणवीरच्या पाठोपाठ अभिनेता राजकुमार रावनंही (Rajkumar Rao) मुंबईत एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केल्याचं समोर आलं आहे. नव्या घरामुळे राजकुमार आता चर्चेत आला आहे. विशेष गोष्ट म्हणजे राजकुमारनं खरेदी केलेलं घर अभिनेत्री जान्हवी कपूरकडून विकत घेतलं आहे. त्यामुळे या घराची अधिकच चर्चा होताना दिसतेय.
अभिनेता राजकुमार रावनं मुंबईमध्ये एक आलिशान ट्रिपलेक्स अपार्टमेंट विकत घेतले आहे. राजकुमारने हे अपार्टमेंट 44 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. हे अपार्टमेंट 3456 स्क्वेअर फूट असून एका स्क्वेअर फूटाची किंमत 1.27 लाख रुपये आहे. जान्हवीनं हे अपार्टमेंट 39 कोटी रुपयांना खरेदी केला होता. त्यामुळे या डीलमधून जान्हवीला 5 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. त्यामुळे या डीलमधून जान्हवीला चांगलाच फायदा झाला आहे.
हेही वाचा - Vidya Balan: 'आम्हालाही जरा बघू द्या ना'; रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर विद्या बालनची भन्नाट प्रतिक्रिया
दरम्यान, राजकुमार आणि जान्हवी कपूर हॉरर कॉमेडी सिनेमा 'रुही'मध्ये एकत्र काम केलं आहे. जान्हवी कपूर आणि राजकुमार राव लवकरच 'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट क्रिकेटवर आधारित असणार आहे. याचे दिग्दर्शन शरण शर्मा करत आहेत. हा स्पोर्ट्स ड्रामा असून या वर्षाच्या अखेरीस रिलीज होऊ शकतो.
View this post on Instagram
दरम्यान, अभिनेता राजकुमार रावची लोकप्रियता मोठ्या प्रमाणार आहे. राजकुमारनं त्याच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं आहे. राजकुमार आगामी 'मिस्टर अँड मिसेस माही', 'भिडे', 'सेकंड इनिंग', 'गन्स अँड गुलाब्स', श्रीकांत भोलाचा बायोपिक आणि 'स्वागत है' या चित्रपटांमध्येही दिसणार आहे. त्यामुळे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांसाठी खूपच उत्सुक आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Janhavi kapoor, Rajkumar rao, Ranveer sigh