अभिनेता राजकुमार रावने खरेदी केली नवी बाइक, किंमत वाचून व्हाल थक्क

अभिनेता राजकुमार रावने खरेदी केली नवी बाइक, किंमत वाचून व्हाल थक्क

राजकुमारनं नुकतीच हार्ले डेविडसन फॅट बॉब (Harley Davidson Fat Bob) बाइक खरेदी केली आहे.

  • Share this:

मुंबई, 15 ऑक्टोबर : अभिनेता राजकुमार राव सध्या बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो. मागच्या काही काळापासून एकामागोमाग एक हिट सिनेमा देत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता राजकुमार लवकरच बाइकवर स्वार होऊन फिरताना दिसणार आहे.

राजकुमारनं नुकतीच हार्ले डेविडसन फॅट बॉब (Harley Davidson Fat Bob) बाइक खरेदी केली आहे. ज्या बाइकची शोरुमची किंमत 14.69 लाख रुपये आहे. ही बाइक 2017 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. याविषयी हार्ले डेव्हिजडसन यांनी ट्विट केलं. त्यांनी लिहिलं, 'अभिनेता राजकुमार राव याचं स्वागत आहे. आम्ही आशा करतो की, तु ही बाइक राइड नक्कीच एंजॉय करशील.'

आवरा! भर कार्यक्रमात आलिया भटची जीभ घसरली, सर्वांसमोर दिली 'ही' शिवी

काय आहेत फिचर्स

या बाइकच्या पहिल्या व्हर्जनच्या तुलनेत या व्हर्जनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. ही बाइक खूपच अग्रेसिव्ह आणि मस्कुलर आहे. याशिवाय याच्या इंजिनमध्येही अनेक बदल करण्यात आले आहेत. 34 स्टिफर 1745 सीसीचं इंजिन आहे 3250 RPM वर 145Nm चा टॉर्क जेनेरेट करतं. तसेच या बाइकचा वेग 180Kmph एवढा आहे.

टीव्ही अभिनेत्रीनं बिकिनी फोटोमध्ये दाखवले शरीरावरील व्रण, म्हणाली...

काही दिवसांपूर्वी क्रिकेटर एम एस धोनी कावासाकी निन्जा एच2 (Kawasaki Ninja H2) बाइक चालवताना दिसला होता. धोनीच्या बाइक वेडाबद्दल सर्वांनाच माहित आहे. 2015 मध्ये भारतात कावासाकी निन्जा एच2 (Kawasaki Ninja H2) खरेदी करणारा धोनी पहिलाच व्यक्ती होता. या बाइकची शोरुम किंमत 29 लाख आहे.

Sheer Qorma लेस्बियन लव्ह स्टोरी सांगणारा नव्या सिनेमाचा लुकने भुवया उंचावल्या

====================================================

मनसेसाठी निवडणुकीच्या प्रचारात उतरला अभिनेता सिद्धार्थ जाधव, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2019 02:31 PM IST

ताज्या बातम्या