मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अभिनेता राजकुमार रावने अर्थमंत्र्यांचे मानले आभार, काय आहे कारण? वाचा

अभिनेता राजकुमार रावने अर्थमंत्र्यांचे मानले आभार, काय आहे कारण? वाचा

Rajkumar Rao

Rajkumar Rao

अर्थमंत्री निर्मला सितारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी काल 01 फेब्रुवारी 2022 ला देशाच्या संसदेत आर्थिक वर्ष 2022-23 चं सर्वसाधारण बजेट (Union Budget 2022) सादर केलं. यानंतर अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) याने इंस्टापोस्ट करत अर्थमंत्र्यांचे आभार मानले.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी: अर्थमंत्री निर्मला सितारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी काल 01 फेब्रुवारी 2022 ला देशाच्या संसदेत आर्थिक वर्ष 2022-23 चं सर्वसाधारण बजेट (Union Budget 2022) सादर केलं. यामध्ये अनेक घोषणा करण्यात आल्या. दरम्यान, अर्थमंत्र्यांनी मानसिक आजारांशी संबंधित केलेली घोषणा पाहून अभिनेता राजकुमार राव( Rajkumar Rao)भलताच खुश झाला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांचे आभार मानले आहेत.

आरोग्य क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या. अर्थमंत्र्यांनी आरोग्यावर लक्ष केंद्रित करून कोरोना महामारीमुळे लोकांचे मानसिक आरोग्य बिघडले आहे. यासाठी राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.

अर्थमंत्र्यांच्या या घोषणेवर खुश होत राजकुमार राव ने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंवर स्टोरी पोस्ट करत आभार मानले. त्याने आपल्या स्टोरी पोस्टमध्ये अर्थमंत्र्यांनी मानसिक आजारांसंदर्भात केलेली घोषणा शेअर कर रेड हर्ट इमोजी शेअर केला आहे.

अर्थमंत्र्यांची घोषणा

अर्थमंत्री म्हणाल्या, कोरोना महामारीमुळे लोकांचे मानसिक आरोग्य बिघडले आहे. यासाठी राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमात मानसिक आरोग्यासाठी काम करणाऱ्या 23 संस्थांचे विलीनीकरण करण्यात येणार आहे.

यात लोक तणाव, नैराश्य आणि अस्वस्थता यांसारख्या विषयांवर बोलू शकतात आणि त्यांना अशा मानसिक विकारांवर उपचार मिळावेत, यासाठी तज्ज्ञांशी फोनवर बोलता येईल.

नॅशनल टेली मेंटल हेल्थ प्रोग्रामद्वारे (National Tele Mental Health Program), लोक थेट तज्ज्ञांशी बोलतील आणि त्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यात यशस्वी होतील.

जगभरात मानसिक आजारांशी संबंधित प्रकरणे वाढत आहेत. त्यांचा थेट परिणाम आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवर होत आहे. मानसिक आजाराची बहुतेक प्रकरणे नैराश्यामुळे येतात. हा सर्वात सामान्य मानसिक विकार आहे, जो जगभरातील 260 दशलक्ष लोकांना प्रभावित करतो.

बहुतेक महिला नैराश्याने ग्रस्त आहेत. संशोधन अहवालानुसार, कोरोनाच्या काळात नैराश्य, तणाव आणि अस्वस्थतेची प्रकरणे वाढली आहेत. केंद्र सरकारच्या नॅशनल टेली-मेंटल हेल्थच्या मदतीने लोकांना मोठा दिलासा मिळू शकतो.

First published:
top videos

    Tags: Budget, Entertainment, Nirmala Sitharaman, Rajkumar rao