मुंबई 29 एप्रिल: अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती रोखठोक प्रतिक्रिया देते. अनेकदा यामुळं तिला ट्रोल देखील केलं जातं. यावेळी राखीनं बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतशी (Kangana Ranaut) पंगा घेतला आहे. नुसती पोकळ बडबड करण्याऐवजी कोरोना रुग्णांना (coronavirus) ऑस्कजनसाठी मदत कर असा सल्ला तिनं कंगनाला दिला आहे.
राखीनं नुकतीच वृत्त माध्यमांना मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनं देशवासींना डबल मास्क वापरण्याचा सल्ला दिला. शिवाय वेळोवेळो हात स्वच्छ करा. सॅनिटायझर वापरा, कारणाशिवाय घराबाहेर पडू नका. लॉकडाउनच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करा असा सल्ला दिला. परंतु मुलाखतीच्या शेवटी नेहमीच्याच अंदाजात तिनं कंगनाशी पंगा घेतला. “नुसती पोकळ बडबड करणं थांबव. तुझ्याकडे कोट्यवधी रुपये आहेत. त्यापैकी थोडे पैसे दान कर कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी मदत कर” असा उपरोधिक टोला तिनं कंगनाला लगावला.
‘मुंबईकरांनो डबल मास्क लावा, अन्यथा’; कतरिना कैफनं शेअर केली BMCची पोस्ट
View this post on Instagram
Shame on you USA: कंगनाने अमेरिकेलाही खडसावलं! 'ते' Tweet अजूनही चर्चेत
भारतात रुग्णसंख्येत थोड्या प्रमाणात घट झाल्याने दिलासा मिळालेला असतानाच पुन्हा एकदा चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशात गेल्या 24 तासांत आतापर्यंतच्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 3293 रुग्णांनी आपला जीव गमावला असून हा आतापर्यंतचा उच्चांक आहे, दैनंदिन रुग्णसंख्याही पुन्हा एकदा वाढली असून गेल्या 24 तासांत 3 लाख 60 हजार 960 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Covid cases, Kangana ranaut, Oxygen supply, Rakhi sawant