1993 मध्ये 'बाजीगर' चित्रपटातून (Bajigar Film) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या शिल्पा शेट्टीची लंडनमध्ये 2007च्या सुमारास राज कुंद्रा यांच्याशी भेट झाली होती. 2007 मध्ये बिग ब्रदर हा रिअॅलिटी शो जिंकल्यानंतर शिल्पा लंडनमध्ये लोकप्रिय झाली. राज व्यावसायिक जगतात प्रसिद्ध होता. शिल्पाच्या S-2 या परफ्यूम ब्रँडच्या प्रमोशनदरम्यान दोघांची भेट झाली. राजने शिल्पाच्या परफ्यूम ब्रँडचा प्रचार करण्यास मदत केली. त्यातूनच दोघांची ओळख वाढत गेली आणि दोघांनी कालांतराने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी राज कुंद्रा यानं आपली पहिली पत्नी कविता हिला घटस्फोट दिला. साखरपुड्यात राजने शिल्पाला 3 कोटी रुपयांची अंगठी दिली होती, तर शिल्पाने लग्नात सुमारे 50 लाख रुपयांचा लेहंगा परिधान केला होता. शाही थाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. हे वाचा - करीनाने शेअर केला पुणे पोलिसांचा तो Video, आजोबांसोबत खास कनेक्शन लग्नानंतर शिल्पाने चित्रपटांमधून ब्रेक घेतला आणि कुटुंबाला वेळ दिला. ती दोन मुलांची आई असून, मोठा मुलगा विवान 9 वर्षांचा, तर मुलगी दोन वर्षांची आहे. फिटनेस आयकॉन (Fitness Icon) म्हणून ओळखली जाणारी शिल्पा शेट्टी अनेक रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून कार्यरत आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Raj kundra, Shilpa shetty, Star celebraties