Home /News /entertainment /

VIDEO : रश्मिकासोबतच्या लिपलॉक सीनमुळे गोंधळ; प्रश्न विचारताच विजय देवरकोंडाचा चढला पारा

VIDEO : रश्मिकासोबतच्या लिपलॉक सीनमुळे गोंधळ; प्रश्न विचारताच विजय देवरकोंडाचा चढला पारा

''लिपलॉक म्हणजे काय वाटतं तुम्हाला? तुम्ही ऑब्जेक्टिफिकेशनबद्दल लिहा. लिपलॉक म्हणजे किस आहे. रागासारखीच तीदेखील एक भावनाच आहे. ''

    नवी दिल्ली, 17 जानेवारी : दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सतत चर्चेत असतात. लाखो तरुणींच्या गळ्यातला ताईत असलेला विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश असलेली रश्मिका गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. रश्मिकाचा 'पुष्पा' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला असून, विजयच्याही 'लायगर' या चित्रपटाचा फर्स्ट लूक चाहत्यांना आवडला आहे. रश्मिका आणि विजय एकमेकांना डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे. दोघांनी आतापर्यंत गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेड या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. दोन्ही चित्रपटांमधली त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. जेव्हा डिअर कॉम्रेडचा (Dear Comrade) ट्रेलर प्रसिद्ध झाला होता तेव्हा विजय देवरकोंडा आणि रश्मिकाच्या किसिंग सीनमुळे (Kissing scenes) गोंधळ उडाला होता. अनेकांनी विजयला सीरियल किसर (serial kisser) इम्रान हाश्मीची (Emraan Hashmi) उपमा दिली होती. या प्रकरणामुळे विजय चांगलाच संतापला होता. किसिंग सीनबद्दल प्रश्न विचारणाऱ्या एका जर्नालिस्टलादेखील त्यानं फटकारलं होतं. 'मेन्सएक्सपी'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, बेंगळुरूतल्या (Bengaluru) एका प्रेस मीटदरम्यान एका जर्नालिस्टनं विजय देवरकोंडाला रश्मिका मंदानासोबतच्या लिपलॉक सीन्सबद्दल प्रश्न विचारला होता. हा प्रश्न ऐकल्यानंतर विजय संतापला होता. त्यानं जर्नालिस्टचा चांगलाच समाचार घेतला होता. 'लिपलॉक म्हणजे काय वाटतं तुम्हाला? तुम्ही ऑब्जेक्टिफिकेशनबद्दल लिहा. लिपलॉक म्हणजे किस आहे. रागासारखीच तीदेखील एक भावनाच आहे. जेव्हा एखादी व्यक्ती रडते म्हणजे ती आपली भावना व्यक्त करत असते. त्याचप्रमाणे किस करणं हीदेखील एक भावनाच (emotion) असते,' असं विजय म्हणाला होता. आपल्याला 'लिपलॉकिंग' (lip locking) हा शब्दच आवडत नाही. जेव्हा हा शब्द कानांवर पडतो तेव्हा तो अतिशय किळसवाणा वाटतो, असंही त्यानं स्पष्ट केलं होतं. याचवेळी रश्मिकानंदेखील आपले विचार मांडले होते. दोन्ही कॅरेक्टर्सनी आपल्या भावना कशा प्रकारे व्यक्त केल्या पाहिजेत हा सर्वस्वी डारेक्टरचा (director) निर्णय असतो. एखाद्या व्यक्तीला ट्रेलरमध्ये (trailer) फक्त किसिंग सीन दिसत असेल, तर तो त्या व्यक्तीचा प्रश्न आहे. त्याची मानसिकताच तशी आहे, असा अर्थ यातूननिघतो, अशा शब्दांत रश्मिकानं विजयच्या म्हणण्याला पाठिंबा दिला होता. किसिंग सीनच्या प्रश्नाला उत्तर देताना विजयनं सविस्तर स्पष्टीकरण दिलं होतं. 'किसिंग ही एक भावना आहे आणि तिचा आपण आदर केला पाहिजे. दोन कॅरेक्टर्सच्या रिलेशनशिपमधली (relationship) इन्व्हॉल्व्हमेंट दाखवण्यासाठी किसिंग सीन लिहिला गेला असेल तर तो तसाच दाखवणं गरजेचं ठरतं. ही अतिशय बेसिक गोष्ट आहे. डिअर कॉम्रेड सिनेमामध्ये विजय आणि रश्मिका किस करत आहेत असं नव्हे, तर बॉबी आणि लिली एकमेकांना किस करताना दाखवलं आहे. ते तशाच दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे,' असं विजय म्हणाला होता. हे ही वाचा-Vijay Deverakonda ने जगातील सर्वात 'या' श्रीमंत व्यक्तीला दिलं निमंत्रण 'आपला असा एकमेव देश आहे, की जिथे लोक हे विसरतात, की पडद्यावर कलाकार भूमिका साकारत असतो. त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्याशी भूमिकांचा काहीही संबंध नसतो. मी रियल लाइफमध्ये स्टंप घेऊन लोकांना मारत नाही किंवा ड्रग्जही घेत नाही. इतकच काय मी स्मोकिंगसुद्धा (smoking) करत नाही. या गोष्टी लोकांनी लक्षात घेतल्या पाहिजेत,' असंही विजय देवरकोंडानं ठणकावून सांगितलं होतं. डिअर कॉम्रेड सिनेमापासून विजय आणि रश्मिका सतत चर्चेत राहिले आहेत. आता ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे दोघांशी संबंधित असलेल्या अनेक जुन्या घटनाही पुन्हा चर्चिल्या जात आहेत.
    First published:

    Tags: Actress

    पुढील बातम्या