Home /News /entertainment /

Kareena Kapoorने शेअर केला पुणे पोलिसांचा तो Video ; आजोबा राज कपूर यांच्यासोबत आहे खास कनेक्शन

Kareena Kapoorने शेअर केला पुणे पोलिसांचा तो Video ; आजोबा राज कपूर यांच्यासोबत आहे खास कनेक्शन

पुणे पोलिसांनी कोरोना जागृतीसाठी राज कपूर स्टाईल गाण्यावर कँपेन सुरू केले आहे. यावर करीना कपूरने प्रतिक्रिया दिली आहे.

  मुंबई, 17 जानेवारी- अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि तिचे आजोबा राज कपूर (Raj Kapoor) यांच्यात खास बाँडिंग होतं. आजोबा आणि नातीतील या खास नात्याबद्दल करीना अनेकदा माध्यमांसमोर बोलली आहे. नुकतेच पुणे पोलिसांनी कोरोना जागृतीसाठी राज कपूर स्टाईल गाण्यावर कँपेन सुरू केले आहे. यावर करीना कपूरने प्रतिक्रिया दिली आहे. राज कपूरच्या मेरा नाम जोकर या चित्रपटातील गाण्यावर केलेली जनजागृतीची मोहीम करीनाला भलतीच आवडली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून यामध्ये पोलीस 'ए भाई जरा देख के चलो' या गाण्याला एका खास अंदाजात गाताना दिसत आहेत. पोलीस राज कपूर यांच्या गाण्याला एका नवीन लिरिक्ससोबत गात असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. पोलीस नागरिकांना मास्क घालण्याचं आवाहन देत आहेत. कोरोना हा काय साधासुधा ताप नाही त्यामुळे त्याला हलक्यात घेऊ नका, असा संदेश पोलीस या गाण्याच्या माध्यमातून देताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत करीना कपूरनं म्हटलं आहे की, ब्रिलियंट व्हिडिओ आणि यासोबतच तिनं क्लॅप इमोजी देखील शेअर केले आहे. सोबत तिनं #RajKapoor असं देखील म्हटलं आहे.
  राज कपूर यांचा मेरा नाम जोकर हा सिनेमा 1970 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन, निर्मिती एडिटिंग आरके बॅनरच्या खाली राज कपूर यांनीच केली होती. या सिनामाची कथा ख्वाजा अहमद अब्बास यांनी लिहिली होती. या सिनेमात राज कपूर, सिमी गरेवाल, ऋषि कपूर, सोनिया रियाबिनकिना, पद्मिनी यांच्याशिवाय मनोज कुमार, धर्मेंद्र आणि राजेंद्र कुमार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. रणधीर कपूर आणि बबीता यांच्या करीना कपूर आणि करिश्मा कपूर मुली आहेत. रणधीर कपूर हे राज कपूर यांचा सगळ्यात मोठा मुलगा आहे. वाचा-Vijay Deverakonda ने जगातील सर्वात 'या' श्रीमंत व्यक्तीला दिलं निमंत्रण करीना आणि करिश्मा सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. इन्स्टावर दोघीही कपूर परिवारासोबत फोटो शेअर करत असतात. तिचे चुलते राजीव कपूर यांचा मागील वर्षी फ्रेबुवारीमध्ये निधन झाले. यावेळी करीना कपूरने एक पोस्ट शेअर केली होती. त्या फोटोमध्ये राज कपूर, रणधीर कपूर, राजीव आणि ऋषि कपूर होते. तिनं म्हटलं होते की, ‘Broken but Strong’. मागच्या काही दिवसापूर्वी करीना कपूरला कोरोना झाला होता. आता ती बरी झाली आहे. करीना नेहमीच चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. तिनं नुकाताच तिचा योगा सेशनचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment, Kareena Kapoor

  पुढील बातम्या