Home /News /entertainment /

शिल्पा शेट्टीच्या पतीची इन्स्टाग्रामवर वापसी, राज कुंद्रानं पत्नीला नव्हे तर याला केलं फॉलो

शिल्पा शेट्टीच्या पतीची इन्स्टाग्रामवर वापसी, राज कुंद्रानं पत्नीला नव्हे तर याला केलं फॉलो

शिल्पा शेट्टीचा पती आणि राज कुंद्रा आपल्या पोर्नोग्राफी प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

  मुंबई, 15 जानेवारी-   बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री शिल्पा शेट्टी   (Shilpa Shetty)   आणि तिचा पती राज कुंद्रा   (Raj Kundra)  गेल्यावर्षी पोर्नोग्राफी प्रकरणामुळे    (Pornography Case)   प्रचंड चर्चेत होते. राज कुंद्राला या प्रकरणात अटक झाली होती. तो मोठ्या कालावधीसाठी तुरुंगात होता. त्यांनतर सोशल मीडियावर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. सध्या राज कुंद्राची जामिनावर सुटका झाली आहे. परंतु तो सोशल मीडिया आणि सार्वजनिक ठिकाणांपासून दूर आहे.राज कुंद्राने सोशल मीडियावर ट्रोल झाल्यापासून आपलं इन्स्टाग्राम अकाऊंट डिऍक्टिव्हेट केलं होतं. परंतु आता पुन्हा एकदा राज ओशाळ मीडियावर परतल्याच दिसत आहे. राज कुंद्राची इन्स्टाग्रामवर वापसी- शिल्पा शेट्टीचा पती आणि राज कुंद्रा आपल्या पोर्नोग्राफी प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्याच्यावर अनेक आरोप लावण्यात आले होते. सध्या तो जामिनावर तुरुंगा बाहेर आहे. परंतु त्याला अजूनही सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. गेली अनेक महिने तो सोशल मीडियापासून दूर आहे. तो अजूनही ट्विटरवर दिसून येत नाहीय. परंतु राज कुंद्राने इन्स्टाग्रामवर वापसी केली आहे. मात्र त्याने आता सर्वांना अनफॉलो केलं आहे. त्याच्या फॉलोविंगची संख्या आता एक आहे. तुम्हाला वाटत असेल की त्यानं फॉलो केलेली एक व्यक्ती त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी असेल? परंतु असं नाही. राज कुंद्राने केवळ एकाच पेजला फॉलो केलं आहे. आणि ती शिल्पा शेट्टी नसून त्याच्या रेस्टोरंटचं पेज आहे. त्यानं केवळ आपल्या रेस्टोरंटच्या पेजला फॉलो केलं आहे.
  राज कुंद्राने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील सर्व जुन्या पोस्ट डिलीट केल्या आहेत. त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर आता एकही पोस्ट पाहायला मिळत नाहीय. झिरो पोस्ट आहे. इतकंच नव्हे तर राज कुंद्राचं हे अकाऊंट आता प्रायव्हेट आहे. राज कुंद्रा सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. काही दिवसांपूर्वी तो सुट्टीसाठी कुटुंबासोबत मसुरीला गेला होता. त्यांनतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला राज कुंद्रा पत्नी शिल्पा शेट्टीसह साई बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला गेले होते. (हे वाचा:Farhan Akhtar-Shibani Dandekar यांच्याकडे लगीनघाई!  यादिवशी अडकणार लग्नबेडीत ) पती राज कुंद्रा तुरुंगात असताना भिनेत्री शिल्पा शेट्टी काळासाठी सोशल मीडियापासून दूर होती. इतकंच नव्हे तर तिने टीव्हीवरील एका रिएलिटी शोमधून ब्रेक घेतला होता. परंतु काही दिवसांनंतर शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर वापसी केली होती. त्यावेळी तिने काही मिनिंगफ़ुल थॉट्स शेअर केले होते. काही लोकांनी कमेंट्स करत शिल्पा शेट्टीला आम्ही तुझ्या सोबत आहे तू खंबीर राहा असं म्हटलं होतं. तर काही नेटकऱ्यांनी तिला चांगलंच सुनावलं होतं. परंतु आता शिल्पा आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतली आहे. ती अधिसारख्या पोस्ट शेअर करता दिसून येते.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment, Raj kundra, Shilpa shetty

  पुढील बातम्या