Home /News /entertainment /

Farhan Akhtar-Shibani Dandekar यांच्याकडे लगीनघाई!  यादिवशी अडकणार लग्नबेडीत

Farhan Akhtar-Shibani Dandekar यांच्याकडे लगीनघाई!  यादिवशी अडकणार लग्नबेडीत

बॉलिवूडमध्ये (Bollywood) सध्या लग्नासराई (Wedding Season) सुरु आहे. एकापाठोपाठ एक कलाकार लग्नाच्या बंधनात अडकत आहेत.

    मुंबई, 14 जानेवारी-   बॉलिवूडमध्ये   (Bollywood)  सध्या लग्नासराई    (Wedding Season)  सुरु आहे. एकापाठोपाठ एक कलाकार लग्नाच्या बंधनात अडकत आहेत. कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नानंतर आता बॉलिवूडमध्ये आणखी एक लग्नगाठ बांधली जाणार आहे. अभिनेता फरहान अख्तर   (Farhan Akhtar)  आणि शिबानी दांडेकर   (Shibani Dandekar)  यांनी अखेर लग्नाचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हे जोडपं पुढच्या महिन्यात मुंबईमध्ये विवाह नोंदणी करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता फरहान अख्तर आणि मॉडेल शिबानी दांडेकर येत्या 21  फेब्रुवारीला मुंबईमध्ये विवाह नोंदणी करणार असल्याचं म्हटलं जात आहे. गेली अनेक दिवस या दोघांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. काही दिवसांपासून हे दोघे लग्नाची तयारी करत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यांनतर आज ही माहिती समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर नेहमीच आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असतो. फरहान गेली अनेक दिवस मॉडेल शिबानी दांडेकरला डेट करत आहे. शिबानी दांडेकर ही अभिनेत्री आणि मॉडेल अनुषा दांडेकरची बहीण आहे. ती खतरों के खिलाडीमध्ये दिसली होती. गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली होती. लवकरच चाहत्यांची इच्छा पूर्ण होणार आहे.  वेब दुनियाने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, शिबानी आणि फरहान अख्तर अत्यंत साध्या पद्धतीने कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे. हे दोघेही आपल्या लग्नामध्ये सब्यसाचीचे ड्रेस परिधान करणार आहेत. (हे वाचा:RRR' मध्ये फक्त 10 मिनिटांसाठी दिसणार आलिया भट्ट! मिळाले तब्बल इतके कोटी ) रिपोर्टनुसार, फरहान आणि शिबानी यांनी इतर कलाकरांप्रमाणे रॉयल वेडिंग करण्याचं स्वप्न बघितलं होतं. त्यांनी यासाठी काही प्लॅनिंगही केलं होतं. परंतु सध्या देशात कोरोना महामारीने पुन्हा डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रोनने लोकांना हैराण करून सोडलं आहे. सर्वसामान्य लोकांप्रमाणे अनेक बॉलिवूड कलाकारांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेत फरहान आणि शिबानी यांनी अत्यंत सध्या पद्धतीने केवळ कुटुंबाचे सदस्य आणि काही जवळचे मित्र यांच्या उपस्थितीत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood, Entertainment, Farhan akhtar

    पुढील बातम्या