मुंबई 6 ऑगस्ट: राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी (Raj Kundra pornography case) प्रकरणामुळे शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) करिअरला उतरती कळा लागली आहे. अनेक मोठ्या जाहिराती आणि फॅशन ब्रँड्सने तिच्यासोबतचे करार रद्द केले. तिला सध्या चित्रपटही मिळत नाहियेत, अन् आता सुपर डान्सर (Super Dancer) या शोमधून देखील तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिल्पामुळे या शोची TRP घसरली होती. शिवाय वारंवार शोवर टीका करण्यात येत होती. परिणामी शिल्पाला बाहेर करण्यात आलं असं म्हटलं जात आहे.
‘सुपर डान्सर’ या लोकप्रिय डान्स शोचा चौथा सीझन सध्या सुरु आहे. याशोमध्ये अलिकडेच सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) हिची एण्ट्री झाली. सोनालीने हा व्हिडीओ आपल्या सोशल अकाऊंट्सवर देखील शेअर केला आहे. या व्हिडीओला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोनाली देखील कधीकाळी एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. परिणामी तिनं छोट्या पडद्यावर पुनरागमन करावं अशी इच्छा तिच्या चाहत्यांनी व्यक्त केली. त्यामुळे चाहत्यांच्या आग्रहाखातर शिल्पाला बाहेर काढून सोनालीला घेतल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
'न्यूड होण्यास नकार दिल्याने संपल करिअर'; नर्गिस फाखरीचा मोठा खुलासा
View this post on Instagram
मराठी वेब सीरिजला मिळणार हक्काचा प्लॅटफॉर्म; येतंय स्वप्निल जोशीचं OTT App
राज कुंद्रा कसा करायचा Pornography बिझनेस?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज लंडनमधील केनरिन नामक एका कंपनीसाठी या पॉर्नपटांची निर्मिती करतो. ही कंपनी भारतात हॉटशॉट नावाचं एक अॅप चालवते. या अॅपवर इतर OTT प्लॅटफॉर्मप्रमाणे महिन्याचं वगैरे सबस्क्रिप्शन मिळत नाही. तर प्रेक्षकांना प्रत्येक चित्रपट किंवा सीरिजसाठी वेगळे पैसे द्यावे लागतात. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार राजने या अॅपवरील अश्लील व्हिडीओंच्या माध्यमातून जवळपास 500 कोटी रुपयांचा नफा आतापर्यंत मिळवला आहे. इंटरनेटवर हजारो पॉर्न वेबसाईट कार्यरत आहेत. गुगलच्या एका सर्वेनुसार भारतातील इंटरनेट युजर सरासरी 8 मिनिटं 23 सेकंद अशा वेब साईटवर घालवतो. या पार्श्वभूमीवर हॉटशॉटने कमी वेळात मोठ्या प्रमाणावर सबस्क्राईबर्स मिळवले होते. अन् त्यामधून नफा देखील कोट्यवधींचा मिळत होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Porn video, Shilpa shetty