2011 मध्ये रणबीर कपूरच्या 'रॉकस्टार' चित्रपटातून आपल्या करियरची सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे नर्गिस फाखरी होय. या चित्रपटामुळे ती खुपचं लोकप्रिय झाली होती. मात्र ती हळूहळू बॉलिवूडमधून गायब झाली. बेधडक असणाऱ्या नर्गिसने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे.
एका पोर्टलशी बोलताना नर्गिसने म्हटलं आहे की, काम करताना मी स्वतः ला काही मर्यादा घालून घेतल्या आहेत. तसेच ती म्हणाली की मला प्रसिद्धीची अजिबात भूक नाहीय.
'मी न्यूड पोझ देऊ की दिग्दर्शकासोबत रात्र घालवू' मी अनेक संधी माझ्या हातातून सोडल्या आहेत, कारण मला अशा कोणत्याच गोष्टी करायच्या नव्हत्या. मी येथे टिकून राहण्यासाठी प्रयत्न नाही केला, कारण माझ्या काही मर्यादा होत्या.
नर्गिसने म्हटलं की खुपचं वाईट वाटत की अशा कारणांमुळे मला करियरपासून दूर व्हावं लागलं. मात्र मी स्वतःला सांगते जी लोक स्वतःच्या तत्व्वंवर चालतात यश त्यानाचं मिळत.
नर्गिसने पुढे म्हटलं की, स्वतःच्या बाबतीत खुपचं सत्यवादी आहे. कोणालाचं मला मनवायची किंवा तयार करायची गरज नाहीय. माझ्यासाठी माझी नैतिक मुल्ये सर्वात जास्त महत्वाची आहेत.
ती म्हणते मी बॉलिवूडमध्ये आनंदी आहे, कारण मी इंटीमेंट सीन नाही करत, मॉडेलिंगमध्ये अनेकवेळा मला नेकड किंवा टॉपलेस शॉट्ससाठी विचारण्यात आलं होतं, मात्र मी या सर्वांमध्ये कम्फर्टेबल नाहीय.