मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा; राज कुंद्रा या कंपनीसाठी करत होता पॉर्नोग्राफी

मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा; राज कुंद्रा या कंपनीसाठी करत होता पॉर्नोग्राफी

पोलीस अधिकारी मिलिंद भारंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार राजच्या वियान इंडस्ट्रीज या कंपनीचे संबंध लंडनमधील केनरिन या कंपनीसोबत आहेत.

पोलीस अधिकारी मिलिंद भारंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार राजच्या वियान इंडस्ट्रीज या कंपनीचे संबंध लंडनमधील केनरिन या कंपनीसोबत आहेत.

पोलीस अधिकारी मिलिंद भारंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार राजच्या वियान इंडस्ट्रीज या कंपनीचे संबंध लंडनमधील केनरिन या कंपनीसोबत आहेत.

मुंबई 21 जुलै: मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मुलींना फसवून पॉर्न चित्रपट तयार करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) याचं नाव देखील समोर आलं आहे. परिणामी पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला अटक झाल्यापासून या प्रकरणात सतत नवनवे खुलासे होत आहेत. (Raj Kundra arrested in Porn case) दरम्यान पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार राजची कंपनी लंडनमधील एका चित्रपट कंपनीसाठी या पॉर्नपटांची निर्मिती करत होती.

राज कुंद्रा केसमध्ये काय आहे शिल्पा शेट्टीची भूमिका? पोलिसांनी केला महत्त्वाचा खुलासा

वरिष्ट पोलीस अधिकारी मिलिंद भारंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार राजच्या वियान इंडस्ट्रीज या कंपनीचे संबंध लंडनमधील केनरिन या कंपनीसोबत आहेत. ही कंपनी हॉटशॉट नावाचं एक अप चालवते. या अपवरील सामुग्रीसाठी राज कुंद्रा त्यांना मदत करतो. पोलिसांच्या हाती काही वॉट्सअप चॅट आणि इमेल्स लागले आहेत. अन् या पुराव्यांच्या आधारावरच त्याला अटक करण्यात आली. सध्या पोलीस या प्रकरणाची आणखी चौकशी करत आहेत.

'या' अभिनेत्रींचं होतं क्रिकेटर्सशी अफेयर; काही काळही टिकू शकलं नाही नातं

हे प्रकरण नेमकं आहे तरी काय?

फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

First published:
top videos

    Tags: Crime, Porn video, Raj kundra, Shilpa shetty