जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Raj Kundra Case: शिल्पा शेट्टीच्या पतीनं कोर्टात दाखल केली याचिका; काय आहे नेमकं प्रकरण?

Raj Kundra Case: शिल्पा शेट्टीच्या पतीनं कोर्टात दाखल केली याचिका; काय आहे नेमकं प्रकरण?

Raj Kundra Case: शिल्पा शेट्टीच्या पतीनं कोर्टात दाखल केली याचिका; काय आहे नेमकं प्रकरण?

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमॅन राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत आला होता. यासाठी त्याला अटकही झाली होती. सध्या तो जामीनावर बाहेर आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 ऑगस्ट-   बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमॅन राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत आला होता. यासाठी त्याला अटकही झाली होती. सध्या तो जामीनावर बाहेर आहे. राज कुंद्रानं आता मुंबईच्या दंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्याने अ‍ॅप्सद्वारे अश्लील चित्रपट बनवणं आणि त्याचं वितरण करणं या प्रकरणातून आपली निर्दोष मुक्तता करण्याची मागणी केली आहे. गेल्यावर्षी या प्रकरणात राजला अटक करण्यात आली होती. राजचे वकील प्रशांत पाटील यांनी 20 जुलै रोजी दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता, त्याचा तपशील आता समोर आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने या कथित गुन्ह्यातून आर्थिक किंवा अन्य प्रकारचा नफा आपण कमावल्याचा कोणताही पुरावा पोलिसांना सापडला नसल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. याशिवाय, फिर्यादीने त्याच्यावर गुन्हेगारी हेतूचा कोणताही आरोप लावलेला नाहीय. अशी याचिका राज कुंद्राच्या वकिलांनी दाखल केली आहे. तर न्यायालयाने फिर्यादी पक्षाला ८ सप्टेंबर रोजी आपला जबाब नोंदवण्यास सांगितलं आहे’. गेल्यावर्षी हे प्रकरण प्रचंड चर्चेत होतं. या प्रकरणात विविध गोष्टी समोर आल्या होत्या. सुरुवातीला एका महिलेने अनेक गंभीर आरोप केल्यानंतर आणि तक्रार दाखल केल्यानंतर राज कुंद्रा आणि इतरांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला होता. नंतर हे प्रकरण मुंबई गुन्हे शाखेकडं पाठवण्यात आलं होतं. राजवर भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 420 (फसवणूक), 292 आणि 293 (अश्लील- अश्लील जाहिराती आणि प्रदर्शनाशी संबंधित) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा आणि महिलांचे अशोभनीय प्रतिनिधित्व (प्रतिबंध) कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हे वाचा: Vijay Deverkonda: विजय देवरकोंडानं कधीही कुणाला म्हटलं नाही I Love You Too, उघड केलं कारण **)** या प्रकरणात राजची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचीसुद्धा चौकशी करण्यात आली होती. राज कुंद्राच्या मुंबईतील कार्यालय आणि जुहू येथील बंगल्यावरही पोलीस अधिकाऱ्यांनी छापे टाकले होते. राजला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जामीन मंजूर झाला होता. त्याच्या सुटकेच्या काही महिन्यांनंतर, राज कुंद्राने एका निवेदनात म्हटलं आहे की, घडलेला संपूर्ण प्रकार हा त्याच्याविरुद्ध रचलेला एक मोठा कट आहे'.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात