102 डिग्री तापात फणफणत होती अभिनेत्री; तरीही थंड पाण्यात करावं लागलं शुटींग

या गाण्याचं शूट गोव्याच्या एका तुरुंगात सुरु होतं.

या गाण्याचं शूट गोव्याच्या एका तुरुंगात सुरु होतं.

  • Share this:
    मुंबई, 22 जून- एखादा चित्रपट किंवा गाणं जितकं यशस्वी होतं, तितकचं त्यासाठी कष्टसुद्धा घेतलेले असतात. बॉलिवूडमधील (Bollywood)  प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत अनेक आश्चर्यकारक किस्से वाचायला मिळतात. 90 च्या दशकातील ‘मोहरा’ (Mohara) हा चित्रपट आपल्या सगळ्यांनाचं आठवत असेल. या चित्रपटातील बरीच गाणी सुपरहिट झाली होती. मात्र यातील एक गाणं असं आहे, जे पावसाच्या पहिल्या सरीपासूनचं आठवायला सुरु होतं. आलं ना लक्षात? हो ‘टिप टिप बरसा पानी’ (Tip Tip Barasa Pani)  हेचं ते गाणं होय. या गाण्याबद्दल आज असाचं एक अजब किस्सा आपण जाणून घेणार आहोत. ‘मोहरा’ या चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणं आजही सर्वांच्या तोंडात असतं. आजही ते तितकचं पसंत केलं जातं. या गाण्याचं शूट गोव्याच्या एका तुरुंगात सुरु होतं. मात्र तिथे पाऊस पडेल असं काहीही नव्हतं. त्यामुळे कृत्रिम पावसात हे गाणं करायचं ठरलं. आणि त्यासाठी  पाण्याचे टँकर मागवण्यात आले होते. मात्र शूटच्या आदल्या रात्रीचं राविनाला खुपचं ताप आला होता. आणि या अवस्थेतचं तिला सेटवर जावं लागलं होतं. (हे वाचा'क्या खूब लगती हो' शहनाजच्या नव्या लुकवर चाहते फिदा, पाहा PHOTO) मात्र अंगात ताप असताना रविनाला पाण्यात भिजून हे गाणं शूट करावं लागलं. गाण्याच्या शूटवेळी रविनाला 102 डिग्री इतका ताप होता. गाण्याचं शूट होईपर्यंत सारखं पाण्यात भिजायचं ब्रेकमध्ये स्वतःला वाळवायचं आणि परत शूट सुरु करायचं असं काहीसं रविनाचं चालू होतं. आणि त्यामुळे तिची तब्येत जास्तचं खराब झाली होती. मात्र हे गाणं बघताना जरासुद्धा जाणवत नाही की रविना आजारी आहे किंवा ती अस्वस्थ आहे. रविनाचं कामाबद्दल असलेलं प्रेम पाहून आजही तिचं कौतुक होतं. आणि हे गाणं जेव्हा रिलीज झालं, तेव्हा त्याला सुपरहिटची पावती मिळाली. हे एक आयकॉनिक गाणं म्हणून ओळखलं जातं. हे गाणं आजही ऐकलं तर पिवळ्या साडीतील बोल्ड रविना डोळयांसमोर आल्याशिवाय राहात नाही.
    Published by:Aiman Desai
    First published: