स्मिताच्या प्रेमात पडण्याआधी त्यांचं लग्न नादिराशी झालं होतं. त्यावर ते सांगतात, “माझं स्मिताशी असलेलं नातं हे नादिरा आणि माझ्यातल्या समस्यांमुळे झालं असं अजिबात नाहीये, ते आपोआप नैसर्गिकरित्या झालं. नादिराने आमचं नातं खूप सामंजस्याने समजून घेतलं.” नादिरा यांना जेव्हा राज-स्मिताच्या नात्याबद्दल कळलं तेव्हा त्यांना अतीव दुःख झालं. त्यांनी वारंवार हे सांगितलं आहे की त्यांच्या मुलांमुळे, जुही आणि आर्यनमुळे आणि थिएटरमुळे त्या यातून बाहेर येऊ शकल्या. सुरवातीच्या काळात राज आणि स्मिता यांच्या नात्यात बरेच तणाव होते. स्मिताला घर तोडणारी आणि संसार मोडणारी एक स्त्री अशा नजरेने पाहिलं जात होतं. राज आणि स्मिता यांना प्रतीक (Prateik Babbar) नावाचा मुलगा आहे जो सुद्धा अभिनय क्षेत्रात करिअर करत आहे. प्रतीकांच्या जन्माच्या वेळी डिलिव्हरी कॉम्प्लिकेशनमुळे स्मिताचा मृत्यू झाला. आणि फिल्म इंडस्ट्रीने एक महान नटी अवघ्या एकतिसाव्या वर्षी गमावली. हे ही वाचा- फिल्म साईन करण्याआधी तुमचे लाडके Bollywood कलाकार करतात 'या' DEMANDS राज यांना स्मिताच्या निधनांनंतर जबर धक्का बसला होता त्यांना या सदम्यातून बाहेर यायला वेळ लागला. त्यांनी पुन्हा आपल्या पहिल्या पत्नीकडे जायचा निर्णय घेतला. त्यांच्या पहिल्या पत्नीनेसुद्धा त्यांना पुन्हा स्वीकारलं. एवढंच नाही तर प्रतीकच प्लांप्शन करण्यात तिने मोठा सहभाग घेतला असं सांगितलं जातं.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Love story, Smita patil