रायगड, 06 जुलै : सिने अभिनेता रितेश देशमुख, दिग्दर्शक रवी जाधव, कादंबरीकार विश्वास पाटील यांचे किल्ले रायगडावरील वादग्रस्त फोटो सध्या व्हायरल होतायेत. या फोटोंमुळे त्यांच्यावर शिवप्रेमींकडून मोठी टीका होतेय. रितेश देशमुखने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचे इतर काही फोटो कालच अपलोड केले आहेत. या फोटोवरही शिवप्रेमींनी टीका केलीय.
किल्ले रायगडावरील राज सदरेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघ डंबरीत बसून फोटो काढणाऱ्या या उन्मत्त कलाकारांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी शिवप्रेमींकडून केली जातेय. किल्ले रायगडाची सुरक्षा सध्या पुरातत्त्व विभागाकडे आहे. असं असतानाही या कलाकारांनी असं धाडस केलंच कसं असा प्रश्न विचारला जातोय.
या संदर्भात रायगड प्राधिकरण समितीचे अध्यक्ष युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी तीव्र आक्षेप घेत चौकशीचे आदेश दिलेत. तसेच पुरातत्व विभागाच्या अधीकार्यांची बैठक घेऊन या संदर्भात कडक धोरण करणार असल्याची माहिती युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी दिलीय.
रवी जाधव रितेश देशमुखला घेऊन शिवाजी हा सिनेमा करतोय. त्याच संदर्भात ते रायगडवर गेले होते.
हेही वाचा
नागपुरात पावसाची संततधार, विधान भवनातली बत्ती गुल, कामकाज तहकूब
मदर तेरेसांच्या संस्थेतून झाली मुलांची विक्री, संशयितांना अटक
सेलिब्रिटींमध्ये कॅन्सर का वाढतोय?