VIDEO: शाहरुखच्या मुलाला क्लबमध्ये नो एण्ट्री; आर्यनला पाहताच वॉचमन भडकला अन्...

VIDEO: शाहरुखच्या मुलाला क्लबमध्ये नो एण्ट्री; आर्यनला पाहताच वॉचमन भडकला अन्...

आर्यन खानला क्लबमध्ये एण्ट्री देण्यास वॉचमननं नकार दिला होता. राहुल वैद्यनं व्हिडिओमध्ये याच प्रसंगाबद्दल सांगत आर्यन खानच्या नम्रता आणि धैर्याचं कौतुक केलं आहे.

  • Share this:

मुंबई 3 मार्च: बिग बॉस सीझन 14चा (Bigg Boss 14) उपविजेता राहुल वैद्यचा (Rahul Vaidya) एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राहुल वैद्य बॉलिवूडचा किंग खान (Shah Rukh Khan) म्हणजेच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं (Aryan Khan) कौतुक करताना दिसत आहे. आर्यन खानला क्लबमध्ये एण्ट्री देण्यास वॉचमननं नकार दिला होता. राहुल वैद्यनं व्हिडिओमध्ये याच प्रसंगाबद्दल सांगत आर्यन खानच्या नम्रता आणि धैर्याचं कौतुक केलं आहे.

राहुल वैद्यनं या व्हिडिओमध्ये आर्यन खानसोबत झालेल्या भेटी दरम्यान आलेला अनुभव शेअर केला आहे. आर्यन खान आपल्या एका मित्रांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी शनिवारी रात्री क्लबमध्ये आला होता. याच दरम्यान काही कारणास्तव सुरक्षारक्षकानं आर्यनला क्लबमध्ये एण्ट्री देण्यास नकार दिला. असे असून सुद्धा आर्यन त्या रक्षकासोबत अगदी नम्रतेने वागला. आर्यनने एकदा सुद्धा तो सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आहे असा उल्लेख केला नाही.

View this post on Instagram

A post shared by (@srkian.aman)

बिग बॉस शो संपल्यानंतर राहुल वैद्य आपली गर्लफ्रेंड दिशा परमारसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी या क्लबमध्ये आला होता. दरम्यान, आर्यनच्या नम्रतापूर्व वागण्यामुळे राहुल वैद्य खूपच प्रभावित झाला. आर्यनसारख्या मुलाला वाढवल्याबद्दल आणि त्याच्यावर खूप चांगले संस्कार केल्याबद्दल राहुलनं शाहरुख आणि गौरी यांचं कौतुक केलं.

अवश्य पाहा - IPL Auction 2021: शाहरुखच्या मुलाकडेही आहे जबाबदारी, लिलावात पहिल्यांदा दिसला आर्यन

दरम्यान, राहुल वैद्य आणि दिशा परमार (Disha Parmar) कधी लग्न करणार आहेत याची त्याचे चाहते वाट पाहत आहेत. बिग बॉस सीझन 14 दरम्यान राहुल वैद्यनं दिशाच्या वाढदिवसानिमित्त तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर दिशा परमारनं शोमध्ये एन्ट्री करत राहुलच्या लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला असल्याचं सांगितलं.

तर दुसरीकडे लग्नाबद्दल राहुल वैद्यनं सांगितलं की, मला वाटतं की मी याचं नियोजन करण्यासाठी तयार आहे. पण मला वेळ वायाला घालवायचा नाही. ती माझ्यासोबत घडलेली सर्वात सुंदर गोष्ट आहे आणि ती नरकासारखीच सुंदर आहे. मी प्रतीक्षा करु शकत नाही.' राहुलच्या म्हणण्यानुसार दिशासोबत नवीन आयुष्य सुरु करण्यासाठी त्याला आता जास्त वाट पाहायची नाही.

Published by: Mandar Gurav
First published: March 3, 2021, 1:19 PM IST

ताज्या बातम्या