चेन्नई, 18 फेब्रुवारी: कोलकाता नाइट रायडर्स (KKR)चा सह-मालक आणि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah rukh Khan)याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) देखील आयपीएल लिलाव 2021 ( (IPL Auction 2021) मध्ये सहभागी झाला आहे. किंग खानचा मुलगा लिलावात सामील होण्याची ही पहिली वेळ आहे. आयपीएलच्या ट्विटर हँडलवरूनही यासंदर्भातील एक फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यात आर्यन जुही चावलाची मुलगी जान्हवीसोबत लिलाव होण्यापूर्वीच्या ब्रीफिंगमध्ये केकेआरच्या टेबलावर बसलेला दिसत होता. या दोघांसह केकेआरचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी मैसूर, जय मेहता आणि संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर हे देखील उपस्थित आहेत. IPL Auction 2021 LIVE Updates शाहरुखचा मोठा मुलगा आर्यन सुरुवातीपासून केकेआरला फॉलो करत आहे. पहिल्या सीझनपासून केकेआरचे सामन्यांमध्ये दिसला आहे. गेल्या हंगामात युएईमध्ये वडिलांसोबत संघाचा सामना पाहतानाही तो स्टेडियममध्ये दिसला होता. याआधीही केकेआर सामन्यादरम्यान तो अनेकदा स्टेडियममध्ये दिसला आहे. आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या फोटोबाबत बोलायचे झाल्या, आर्यन ऑक्शन टेबलवर बसून केकेआरसाठी खेळाडू निवडण्याची ही पहिलीच वेळ असेल.
📸📸 Snapshots from the 2️⃣0️⃣2️⃣1️⃣ VIVO IPL Player Auction Briefing here in Chennai. #IPLAuction pic.twitter.com/U41oDD2bfp
— IndianPremierLeague (@IPL) February 17, 2021
IPL Auction 2021: या हंगामात बोली लागणं महत्त्वाचं, अन्यथा या 5 खेळाडूंचा ‘खेळ’ होणार खल्लास जुहीची मुलगी याआधीही ऑक्शनमध्ये झाली आहे सहभागी आर्यन पहिल्यांदा लिलावाला उपस्थित राहतोय तर दुसरीकडे जुही चावलाच्या मुलीसाठी लिलाव काही नवीन नाही. जुहीची मुलगी जान्हवी ही याआधी देखील आयपीएल लिलावासाठी उपस्थित राहिली आहे. जुहीसंदर्भात एक पोस्टही केकेआरने त्यांच्या ट्विटर हँडलवरुन शेअर केली आहे. The youngest bidder अशी उपमा केकेआरने जान्हवीला दिली आहे.
या दोन्ही स्टारकिडचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आर्यन या लिलावासाठी उपस्थित असल्याने चाहते खूप उत्सुक आहेत. कोलकात्याकडे किती रक्कम आहे शिल्लक? खेळाडूंची संख्या : 17 विदेशी खेळाडूंची संख्या : 06 शिल्लक जागा : 08 विदेशी खेळाडूंची शिल्लक जागा : 02 शिल्लक रक्कम: 10.75 कोटी रुपये

)







