स्टार अभिनेता लग्नानंतर दुसरीसोबत राहिला रिलेशनशिपमध्ये आणि तिसरीच्या बाळाचा झाला 'बाबा'

स्टार अभिनेता लग्नानंतर दुसरीसोबत राहिला रिलेशनशिपमध्ये आणि तिसरीच्या बाळाचा झाला 'बाबा'

प्रेमाचा सत्यानाश! या प्रसिद्ध स्टारनं लग्नानंतरही केली अशी प्रेम प्रकरणं ज्याचा गुंता आयुष्यात सुटणार नाही

  • Share this:

मुंबई, 26 फेब्रुवारी : 'पीपली लाइव्ह' आणि 'लगान' यासारख्या सिनेमात काम केलेले 62 वर्षीय दिग्गज अभिनेता रघुवीर यादव यांची पत्नी पूर्णिमा खरगा यांनी घटस्फोटाची याचिका दाखल केल्यानंतर रघुवीर यांच्या आणखी काही गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूर्णिमा खरगा यांनी रघुवीर यांचे अनेक महिलांशी विवाहबाह्य संबंध होते असं सांगतानाच ते त्यांच्या मित्राच्याच पत्नीसोबत लिव्ह इन रिलेशिपमध्ये राहत होता असा गंभीर आरोप देखील केला आहे.

काही दिवसांपूर्वी रघुवीर यादव यांच्या पत्नीनं घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. ज्यात त्यांनी या केसच्या सुनावणीसाठी 1 लाख रुपये आणि पोटगी म्हणून 10 कोटी रुपयांची मागणी केली आहे. या दोघांच्या लग्नाला आता जवळपास 32 वर्ष झाली आहेत. त्यांचा 30 वर्षीय मुलगा सध्या आई पूर्णिमासोबत राहतो. पूर्णिमा यांनी नुकतीच स्पॉटबॉय-ईला मुलाखत दिली ज्यात त्यांनी आपल्या पतीच्या विवाहबाह्य संबंधाचा खुलासा करत त्याच्यावर गंभीर आरोपही केले. आपल्या पतीचे अनेक महिलांशी विवाहबाह्य संबंध होते तसेच तो त्याचा मित्र अभिनेता संजय मिश्राची पत्नी रोश अचरेजा हिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत होता हे त्यानं स्वतःच कोर्टात स्वीकारलं आहे असंही त्या म्हणाल्या.

सनी लिओनी जखमी झाली की काय? मेकअप बघून चाहते झाले हैराण, पाहा VIDEO

रघुवीर यादव याची पत्नी पूर्णिमा म्हणाल्या, लग्नाच्या जवळपास 7 वर्षांनंततर आमच्यात वाद होऊ लागले. त्यावेळी रघुवीर एका मालिकेत काम करत होते. त्यावेळी ते एका महिलेच्या प्रेमात पडले. ही महिला कोण होती असं विचारलं असता पूर्णिमा यांनी अभिनेत्री नंदिता दास हिचं नाव घेतलं. त्या पुढे म्हणाल्या, रघुवीर माझ्या कुटुंबीयांना भेटून घटस्फोट घेण्याची तयारी केली होती. यानंतर त्यांना नंदिताशी लग्न करायचं होतं. मात्र नंतर नंदितानं त्यांना सोडलं आणि ती दुसऱ्या कोणाच्या प्रेमात पडली.

रघुवीर आणि त्यांची पत्नी पूर्णिमा मागच्या 25 वर्षांपासून वेगळे राहतात. पूर्णिमा यांनी घटस्फोटासाठी याचिका दाखल केली आहे. ज्यात त्यांनी या केसच्या सुनावणीसाठी 1 लाख रुपये आणि पोटगी म्हणून 10 कोटी रुपयांची मागणी केली आहे. मी माझ्या मुलाचा विचार करुन घटस्फोट घेणं टाळलं होतं. पण मला माहित होतं की ते पुन्हा कधीच परत येणार नाहीत असंही पूर्णिमा यांनी या मुलाखतीत सांगितलं. सध्या पूर्णिमा आणि त्यांचा 30 वर्षीय मुलगा अंधेरी येथे राहतात.

त्या रात्री नेमकं काय झालं? अभिनेत्री दिव्या भारतीच्या मृत्यूचं न उलगडलेलं कोडं

आधी संजय मिश्राशी मैत्री आणि मग त्याच्या पत्नीसोबत राहिले लिव्ह-इनमध्ये

पूर्णिमा यांनी रघुवीर यांच्यावर आरोप केला आहे की, नंदिता दासशी घटस्फोट झाल्यानंतर रघुवीर गोरेगांवमध्ये राहायला गेले. त्याच्या जवळपासच अभिनेता संजय मिश्रा राहत होता. दोघांमध्ये मैत्री झाली. संजय अनेकदा रघुवीर यांना आपल्या घरी पार्टी किंवा डिनरसाठी बोलवत असत. या सर्वात रघुवीर आणि संजय यांची पत्नी यांच्यात जवळीक वाढली. काही दिवसांनी ती गर्भवती राहिली आणि तिनं संजय मिश्राकडून घटस्फोट घेतला.

रघुवीर यादव यांनी 1988 मध्ये पूर्णिमा खरगा यांच्याशी लग्न केलं होतं. त्यावेळी पूर्णिमा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कथ्थक नर्तिका होत्या आणि रघुवीर बॉलिवूडमधील एक स्ट्रगलिंग अभिनेता होते. पूर्णिमांच्या मते, रघुवीर यांना त्यांच्या करिअरकडे लक्ष देता यावं यासाठी पूर्णिमांनी आपलं करिअर सोडलं. हळूहळू रघुवीर सिनसृष्टीत यशस्वी होत गेले. पण त्यासोबतच त्यांना आपल्या पत्नी आणि मुलाचा विसर पडत गेला. 1995 मध्ये रघुवीर आपला मुलगा आणि पत्नी यांना सोडून निघून गेले त्यानंतर त्यांनी पुन्हा कधीच मागे वळून पाहिलं नाही.

'आता स्वत:च्या बाळाचा विचार कर..', चिमुरडीबरोबर सलमानचा VIDEO पाहून फॅनचा सल्ला

पूर्णिमा यांनी त्यांच्या याचिकेत म्हटलं आहे, 80 च्या दशकात त्या प्रसिद्ध पंडित बिरजू महाराज यांच्याकडे कथ्थकचे धडे घेत होत्या. या सोबतच जगभरात त्यांचे शो होत असत. रघुवीर यांच्याशी तिची ओळख नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये झाली होती. जवळपास 6 महिने एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी 1988 मध्ये त्याच्या जबलपूर या गावी लग्न केलं.

First published: February 26, 2020, 9:26 AM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या