'आता स्वत:च्या बाळाचा विचार कर..', चिमुरडीबरोबरचा सलमानचा VIDEO पाहून फॅनने दिला सल्ला

'आता स्वत:च्या बाळाचा विचार कर..', चिमुरडीबरोबरचा सलमानचा VIDEO पाहून फॅनने दिला सल्ला

सलमान खान लहान मुलांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. अनेकदा त्याचे लहान मुलांबरोबरचे फोटो व्हायरल होत असतात. सध्या त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि त्यावर त्याच्या एका फॅनने केलेली कमेंट देखील भन्नाट आहे.

  • Share this:

मुंबई, 25 फेब्रुवारी : सलमान खान लहान मुलांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. अनेकदा त्याचे लहान मुलांबरोबरचे फोटो व्हायरल होत असतात. त्याची बहिण अर्पिता खानच्या मुलांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस उतरतात. सलमान खानच्या सिनेमात असणाऱ्या Cute बालकलाकारांना देखील प्रसिद्धी मिळते.

सलमान खानचा असाच एका लहान मुलीबरोबरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका चिमुकल्या फॅनसोबत पोज देताना सलमान खान दिसत आहे. या छोट्या फॅनच्या गालावर Kiss करताना सलमानने तिला मिठी मारली आहे. सलमानचं या कृतीनंतर या चिमुकलीच्या चेहऱ्यावर हासू उमटलं आहे. तिला झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येतोय.

सोशल मीडियावर Viral Bhayani ने हा व्हिडीओ शेअर केला आहे. सलमान खानच्या अनेक फॅन्सनी यावर कमेंट केली आहे. ‘सलमानने आता स्वत:च्या मुलांचा विचार करावा’, अशा आशयाच्या कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत.

सलमान खानचं लग्न हा त्याच्या फॅन्सचा आवडीचा विषय आहे. त्यावर अनेकदा चर्चेचं गुऱ्हाळ सुरू असतं. मात्र आता फॅन्सनी चक्क सलमान खानला बाळाचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे.

First published: February 25, 2020, 7:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading