मुंबई 27 मार्च**:** होळीचा (Holi 2021) सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अगदी सर्वसामान्य लोकांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण विविध रंगांची उधळण करुन हा सण साजरा करतात. यंदाच्या होळीला आता केवळ एकच दिवस उरला आहे. त्यामुळं सेलिब्रिटींचे होळी खेळतानाचे जुने फोटो आणि व्हिडीओज सध्या चर्चेत आहेत. मात्र यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) व्हिडीओ सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. 21 वर्षांपूर्वी शाहरुखनं पत्नी गौरीसोबत खेळलेल्या होळीचा हा व्हिडीओ पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा देत आहे. (Holi Video) अवश्य पाहा - जेठालालचं तारक मेहतासोबत झालं भांडण?; अभिनेत्यानं सांगितलं मतभेदाचं कारण…
बॉलिवूडचे शोमॅन सुभाष घई आपल्या सेलिब्रिटी पार्ट्यांसाठी प्रसिद्ध आहेत. 2000 साली त्यांनी होळीनिमित्त एका खास पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत त्यावेळच्या अनेक नामांकित कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र यापैकी शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं. त्यांनी अक्षरश: धुमाकूळ घालून होळीचा आनंद घेतला होता. 21 वर्षांपूर्वी सेलिब्रेट केलेल्या या होळीचा व्हिडीओ आता पुन्हा एकदा चर्चेत आहे. चाहते या व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या आवडत्या कलाकारांना होळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.