जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / धक्कादायक! प्रसिद्ध निर्मात्याने पत्नीला कारने चिरडलं; परस्त्रीसोबत पकडल्याने केला कांड, CCTV फुटेज VIRAL

धक्कादायक! प्रसिद्ध निर्मात्याने पत्नीला कारने चिरडलं; परस्त्रीसोबत पकडल्याने केला कांड, CCTV फुटेज VIRAL

कमल किशोर मिश्रा

कमल किशोर मिश्रा

मनोरंजन सृष्टीतून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. ‘भूतियापा’, ‘देहाती डिस्को’ सारखे चित्रपट निर्माण करणारे निर्माता कमल किशोर मिश्रा यांच्यावर पत्नीला कारने चिरडल्याचा आरोप आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 ऑक्टोबर-   मनोरंजन सृष्टीतून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. ‘भूतियापा’, ‘देहाती डिस्को’ सारखे चित्रपट निर्माण करणारे निर्माता कमल किशोर मिश्रा यांच्यावर पत्नीला कारने चिरडल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. वास्तविक, पत्नीने कमलला दुसऱ्या महिलेसोबत पकडलं होतं. त्यानंतर हा अपघात झाला. पोलिसांनी बुधवारी सांगितले की, घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कमलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये कमलची पत्नी जमिनीवर पडताना दिसत आहे. ही घटना 19 ऑक्टोबर रोजी पश्चिम अंधेरीतील एका निवासी इमारतीच्या पार्किंग परिसरात घडली. ANI या वृत्तसंस्थेने या घटनेचा एक्स्ल्युझिव्ह व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की पार्किंग एरियामध्ये एक महिला कार चालकाला थांबवते. पण तो थांबत नाही आणि तिला कारसमोर धडकतो. ती महिला पडते आणि नंतर कारचा पुढचा भाग तिच्यावर आदळतो. यामध्ये एक व्यक्ती धावत येऊन महिलेला कारखालून बाहेर काढतो.

जाहिरात

पत्नीला कारने धडक दिल्याप्रकरणी चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा यांच्याविरोधात आंबोली पोलीस ठाण्यात आएपीसी कलम 289 आणि 338 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर ओल्या डोक्याला जबर दुखापत झाल्याचं त्यांच्या पत्नीचं म्हणणं आहे. दरम्यान चित्रपट निर्माता कमल अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरु असून याप्रकरणी तपास सुरु असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. (**हे वाचा:** Esmayeel Shroff Death: ज्येष्ठ दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ यांचं निधन; दिलेत बुलंदीसारखे सुपरहिट सिनेमे ) या वृत्तसंस्थेनुसार, आंबोली पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, “चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा यांच्याविरुद्ध आंबोली पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम 279 आणि 338 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीला कारने धडक दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमलाची पत्नी सांगते की, तिच्या डोक्याला दुखापत झाली आहे. आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.”

News18लोकमत
News18लोकमत

कमल किशोर मिश्रा यांच्या पत्नीचा दावा- बॉलिवूड निर्माता कमल किशोर मिश्रा यांच्या पत्नीने पोलिसांना जबाब नोंदवत सांगितलं की, ‘जेव्हा मी कमल किशोर मिश्रा यांच्या घरी गेले होते. तेव्हा ते आपल्या कारमध्ये एका दुसऱ्या महिलेसोबत बसले होते. ते त्या महिलेसोबत रोमँटिक होत होते. हे सर्व पाहून मी कारच्या खिडकीची काच ठोठावली. त्यांना खिडकी उघडण्यास सांगितलं. मला त्यांच्याशी बोलायचं असल्याचंही सांगितलं. परंतु त्यांनी माझं काहीच नाही ऐकलं. आणि ते कार चालू करुन पळ काढू लागले. यादरम्यान मी गाडी खाली आले. त्यांनी मलाच चिरडलं. या घटनेदरम्यान माझ्या डोक्याला जरब दुखापत झाली आहे’.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात