Home /News /entertainment /

'तुझ्याबरोबर काम करणं...' प्राजक्तानं मुक्ता बर्वेसाठी लिहलेली 'ती' पोस्ट होतेय VIRAL

'तुझ्याबरोबर काम करणं...' प्राजक्तानं मुक्ता बर्वेसाठी लिहलेली 'ती' पोस्ट होतेय VIRAL


'तुझ्याबरोबर काम करणं...' प्राजक्तानं मुक्ता बर्वेसाठी लिहलेली 'ती' पोस्ट होतेय VIRAL

'तुझ्याबरोबर काम करणं...' प्राजक्तानं मुक्ता बर्वेसाठी लिहलेली 'ती' पोस्ट होतेय VIRAL

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळीनं अभिनेत्री मुक्ता बर्वेसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सध्या व्हायरल होत असून एक अभिनेत्री दुसऱ्या अभिनेत्रीचं कौतुक करताना पाहून प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केला आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 23 जून:  सध्या मराठी सिनेसृष्टीत जिच्या एकाहून एक दमदार कलाकृती समोर येत आहेत. ती चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी ( Prajakta Mali ) रानबाजारनंतर ( Raanbaazaar) अभिनेत्रीचा 'वाय' (Y the Film) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रानबाजारमधल्या बिनधास्त रत्नानंतर (Raanbaazaar Ratna) प्राजक्ता वाय सिनेमात एका साध्या तुमच्या आमच्यातल्या गृहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. वाय सिनेमात मुक्ता बर्वेसह (Mukta Barve) तगडी स्टार कास्ट पाहायला मिळणार आहे. मराठीतील दोन आघाडीच्या अभिनेत्री एकत्र एका स्क्रिनवर दिसणार आहे. मुक्ता आणि प्राजक्ता पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहे. याच निमित्तानं प्राजक्तानं मुक्तासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. (Prajakta Mali Special Post for Mukta Barve) मराठीतील एक समजूतदार आणि दरवेळी वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे सर्वांची लाडकी अभिनेत्री आहे. प्राजक्तासाठी मात्र मुक्ता बर्वे तिची लाडकी मुक्ता ताई आहे. वाय सिनेमाच्या प्रमोशननिमित्त दोघी एकत्र दिसल्या. मुक्ताकडून प्राजक्ताला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्यात. याविषयी तिनं मुक्तासाठी खास पोस्ट शेअर केलीय. प्राजक्तानं म्हटलंय, 'मूक्ता ताई तूझ्याबरोबर काम करण्याची त्यानिमित्ताने तुझ्याबरोबर वेळ घालवण्याची संधी “Y” चित्रपटामुळे मिळाली. आपण ज्या व्यक्तीला आपला आदर्श मानतो त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे हो तुझ्याबरोबर काम करणं माझ्यासाठी फार स्पेशल होतं. हे सगळं कॅप्टन ऑफ द शिप अजित वाडीकर यांच्यामुळे शक्य झालं', असं म्हणत प्राजक्तानं सर्वांचे आभारही मानलेत.
  सिनेमातील कलाकार 'वाय' सिनेमाच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त होते. मात्र आता प्रमोशन संपल असून 24 जूनला सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 'प्रमोशन आणि वाट पाहणं आता संपलं आहे. आम्ही उद्या तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये येतो...', असं म्हणतं प्राजक्तानं सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांना आवाहन केलं आहे. 'वाय' या शब्दामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. सिनेमा सत्य घटनांवर आधारित असून आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची, अस्तित्वासाठीच्या संघर्षाची कहाणी सिनेमात दाखवण्यात येणार आहे.  वाय हा मराठीतील पहिला हायपरलिंक सिनेमा असणार आहे. सिनेमात मुक्ताबरोबर अभिनेत्री प्राजक्ता माळी, नंदू माधव, ओमकार गोवर्धन, रसिका चव्हाण, सुहास शिरसाट, संदीप पाठक हे कलाकार आहेत. त्याचप्रमाणे रोहित कोकाटे, संदीप दंडवते, प्रदीप भोसले हे कलाकारही आहेत.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Mukta barve

  पुढील बातम्या