Home /News /entertainment /

RaanBaazaar : अनपेक्षित घटनांचा उलगडा होणार, 'रानबाजार'च्या शेवटच्या भागांचा थ्रिलर 'या' दिवशी पाहायला मिळणार

RaanBaazaar : अनपेक्षित घटनांचा उलगडा होणार, 'रानबाजार'च्या शेवटच्या भागांचा थ्रिलर 'या' दिवशी पाहायला मिळणार


RaanBaazaar:अनपेक्षित घटनांचा उलगडा होणार, 'रानबाजार'च्या शेवटच्या भागांचा थ्रिलर 'या' दिवशी पाहायला मिळणार

RaanBaazaar:अनपेक्षित घटनांचा उलगडा होणार, 'रानबाजार'च्या शेवटच्या भागांचा थ्रिलर 'या' दिवशी पाहायला मिळणार

'रानबाजार' 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर (Planet Marathi OTT) झळकल्यानंतर त्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. रानबाजारचे शेवटचे दोन एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

  मुंबई, 09 जून:  मागचे काही दिवस फक्त आणि फक्त अभिजित पानसे दिग्दर्शित 'रानबाजार'  (RaanBaazaar Web Series)  या वेब सीरिजची चर्चा आहे.  तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit)  आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali)  मुख्य भूमिकेत असलेली ही सीरिज प्रेक्षकांसाठी खास ठरलीच पण सीरिजमधून समोर आलेल्या अभिनेत्रींच्या बोल्ड लूकमुळे चर्चांना अधिकच उधाण आले. पॉलिटिकल थ्रिलर असणाऱ्या या भव्य वेबसीरिजची 'असंच काहीसं घडलं होतं... कदाचित ?!' ही टॅगलाईनच बरेच काही सांगून जाणारी आहे.  सीरिजच्या पहिल्या भागापासूनच येणाऱ्या प्रत्येक भागाची उत्सुकता जबदरस्त वाढवली.  'रानबाजार' 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर (Planet Marathi OTT) झळकल्यानंतर त्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला.  प्रत्येक आठवड्याला वेबसीरीजचे दोन -तीन भाग प्रदर्शित झाले. प्रत्येक भागाच्या शेवटी पुढच्या भागाची उत्सुकता ताणून धरली होती.  10 भागांच्या या सीरीजचे आता शेवटचे आणि अत्यंत खळबळजनक असे दोन भाग प्रदर्शित होणं बाकी आहे. (Raan Baazaar Web Series Final Episode )  हे भाग १० जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.  नेमकं काय घडलं रत्ना आणि आएशाच्या आयुष्यात?  राजकारण नेमकं कसं ढवळलं गेलं?  या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना 10 जूनला मिळणार आहे. रानबाजारच्या पहिल्याच भागात राजकारणातील एका मोठ्या व्यक्तीची हत्या झाल्याचे दिसत आहे.  ही हत्या कोणी केली? हा हनी ट्रॅप आहे की, या मृत्यूमागे आणखी काही कारण आहे? या हत्येमागे आणखी कोणी सूत्रधार आहे? असे अनेक प्रश्न पहिला भाग मागे सोडून गेला. पहिल्या भागापासून सुरू झालेल्या पॉलिटिकल थ्रीलर ड्रामानं प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवलं आहे. हेही वाचा - मनसे नेते अभिजीत पानसे सचिन वाझेच्या भेटीला; चर्चांना उधाण बोल्ड बिनधास्त रत्ना (Ratna in RaanBazaar)  म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता माळी स्टायलिश आयेशाला (Aayesha in RaanBaazaar)  का आसरा देते? तसेच सीरिजच्या तिसऱ्या भागात आलेला चारुदत्त मोकाशी (Charudatta Mokashi)  म्हणजेच स्वत: दिग्दर्शक  अभिजित पानसे या सर्व प्रकरणाचे धागेदोरे शोधण्यात यशस्वी होणार का?  मुख्यमंत्रीपदी कोण येणार? सत्तापालट होणार का ? या आणि अशा अनेक प्रश्नांचा उलगडा पुढील दोन भागांत होणार आहे.
  मुख्यमंत्री सतीश नाईक ( मोहन आगाशे), सयाजी पाटील ( मोहन जोशी), पत्रकार दिवेकर ऊर्फ आप्प्पा (मकरंद अनासपुरे), निशा (उर्मिला कोठारे), युसूफ पटेल ( सचिन खेडेकर), इन्स्पेक्टर पालांडे (वैभव मांगले), रावसाहेब यादव ( अनंत जोग) , प्रेरणा सयाजीराव पाटील ( माधुरी पवार) या सर्वांनीच आपापल्याभूमिका अगदी चोख पार पाडल्या आहेत. प्रत्येक क्षणी आपली उत्कंठा वाढवणाऱ्या या वेब सीरिजमध्ये या तगड्या मल्टिस्टार कास्टनं सर्वांच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. वेब सीरिजची शेवटी येणाऱ्या गाण्यानं देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. 'कुंडी लगालो सय्या' (Kunddi Lagalo Saiya)  हे गाणं प्रेक्षकांना खास आवडलं आहे. अभिजीत पानसे यांनी हे गाणं लिहील असून गाण्याला वेगळी चाल आणि म्युझिकचा तडका देण्यात आलाय.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment, OTT, Web series

  पुढील बातम्या