मुंबई, 17 जुलै : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या (Maharashtra Board HSC Result 2020) परीक्षांचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 90.66 टक्के लागला आहे. त्याचप्रमाणे सीबीएसईचा देखील दहावीचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला होता. हे निकाल जाहीर झाल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे, तर अनेकजण कमी गूण मिळाल्यामुळे नाराज आहेत. त्यामुळे प्रसिद्ध अभिनेता आर माधवन (R. Madhavan) याने या मुलांसाठी खास मेसेज सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्याने त्याचे मार्क्स या विद्यार्थ्यांबरोबर शेअर केले आहेत आणि विद्यार्थ्यांना खास सल्ला देखील दिला आहे.
(हे वाचा-अभिनेत्रीच्या नावाने अपलोड केले गेले अश्लील VIDEO, तिने ट्विटरवर घेतली शाळा)
विशेष म्हणजे माधवनने त्याचा एक फनी फोटो या ट्वीटबरोबर शेअर केला आहे. त्याने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न या पोस्टमधून केला आहे. त्याने असे लिहिले आहे की, 'ज्यांनी बोर्डाच्या परीक्षेत अपेक्षित यश मिळवले त्यांचे अभिनंदन. बाकीच्यांना मी एवढेच सांगू इच्छितो की मला बोर्डाच्या परीक्षेत केवळ 58 टक्के मिळाले होते. खरा खेळ तर अजून सुरू नाही झाला आहे मित्रांनो...' या पोस्टमध्ये त्यांनी काही फनी स्माइलीज देखील शेअर केल्या आहेत.
To all those who just got their board results— congratulations to those who exceeded their expectations and aced it . .. and to the rest I want to say I got 58% on my board exams.. The game has not even started yet my dear friends ❤️❤️ pic.twitter.com/lLY7w2S63y
— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) July 15, 2020
माधवनचा हा फोटो आणि त्याची पोस्ट चेहऱ्यावर हसू आणणारी असल्याने तो खूप व्हायरल होत आहे. अनेकांनी ही पोस्ट रिट्वीट केली आहे तर शेकडो कमेंट्स यावर आल्या आहेत.
(हे वाचा-आता मुंबई पोलिसांसाठी धावला सोनू सूद, 25000 'फेस शिल्ड'ची केली मदत)
सोशल मीडियावर माधवन नेहमी सक्रीय असतो. काही दिवसांपूर्वी अनेकांचा आवडीचा सिनेमा RHTDM अर्थात 'रेहना है तेरे दिल मैं' चा सिक्वेल येणार अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र या वृत्ताला त्याने नकार दिला आहे. लवकरच त्याचा सिनेमा रॉकेट्री: द नांबी इफेक्ट (Rocketry: The Nambi Effect)प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जो इस्रोचे माजी वैज्ञानिक नांबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित आहे.