अभिनेत्रीच्या नावाने अपलोड केले गेले अश्लील VIDEO, तिने ट्विटरवर घेतली शाळा

अभिनेत्रीच्या नावाने अपलोड केले गेले अश्लील VIDEO, तिने ट्विटरवर घेतली शाळा

'साकी साकी गर्ल' कोएना मित्राने असा आरोप केला आहे की, एका युट्यूब अकाउंटवर तिच्या नावाने अश्लील व्हिडीओ पोस्ट केले जात आहेत.

  • Share this:

मुंबई, 17 जुलै : सोशल मीडिया हे फॅन्स आणि कलाकार यांना जोडणारे एक महत्त्वाचे माध्यम आहे. दरम्यान काही चाहते त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींचे फॅन पेज देखील सोशल मीडियावर चालवत असतात. त्यावर सेलिब्रिटींबाबत काही व्हिडीओ, फोटो पोस्ट केले जातात. मात्र काही सोशल मीडिया पेजवर सेलिब्रिटींच्या नावाचा दुरुपयोग केल्याच्या घटना घडत आहेत. अभिनेत्री कोएना मित्रा (Koena Mitra) बरोबर देखील असाच काहीसा प्रकार घडला आहे. तिने एक युट्यूब अकाउंटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. हा स्क्रीनशॉट शेअर करत तिने या अकाउंटबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तिने असा आरोप केला आहे की, या अकाउंटवर तिच्या नावाने अश्लील व्हिडीओ पोस्ट केले जात आहेत. ही माहिती शेअर करताना तिने या युट्यूब पेजला कडक शब्दात फटकारले आहे.

कोएनाने तिच्या ट्विटरवर एका पाठोपाठ एक ट्वीट केले आहेत. ज्यामधील पहिल्या ट्वीटमध्ये तिने दोन स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. एक स्क्रीनशॉट यूट्यूब अकाउंटचा आहे, तर दुसरा इन्स्टाग्राम अकाउंटचा आहे. यातील युट्यूब अकाउंटमध्ये कोएना मित्राचे नाव आणि तिचाच डिस्प्ले फोटो आहे.

(हे वाचा-बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी अशी दिसायची 'मॉडेल' कतरिना, PHOTO व्हायरल)

या अकाउंट अत्यंत अश्लील व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. कोएनाने असं ट्वीट केले आहे की, 'तुम्हाला असं वाटतं का ही हा फॅन क्लब आहे? फॅन्स असे शेडी फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करतात का? या अकाउंटच्या माध्यमातून मला बदनाम करण्यात येत आहे. याचे मेल/अकाउंट डीटेल/बायो सर्व चेक करा, हा गुन्हा नाही आहे तर काय आहे?'

यानंतर केलेल्या ट्वीटमध्ये कोएनाने एका ट्विटर युजरला उत्तर दिले आहे. ज्याने पहिल्या पोस्टमधील इन्स्टाग्रामच्या स्क्रीनशॉटबाबत सवाल उपस्थित केला होता की- काय हे दोन्ही अकाउंट एकच व्यक्ती चालवत आहे का? मला डाव्या बाजुला असणाऱ्या इन्स्टाग्राममध्ये कोणतीही अश्लीलता आढळून येत नाही आहे पण उजव्या बाजुचे (युट्यूब) अत्यंत वाईट आहे.

(हे वाचा-आता मुंबई पोलिसांसाठी धावला सोनू सूद, 25000 'फेस शिल्ड'ची केली मदत)

युजरच्या या प्रश्नाचे उत्तर देताना कोएनाने असे लिहिले आहे की, 'दोन्ही अकाउंट चुकीची आहेत. एकतर हे फॅन क्लब नाही आहेत, किंवा फॅन पेज नाही आहेत. साहिल आणि सना खान कोण आहेत? हे लोकं युट्यूब चॅनेल चालवतात आणि पॉर्न व्हिडीओ पोस्ट करत आहेत. कमेंट करण्यााआधी त्यांचा बायो वाचा'.

'साकी साकी गर्ल' नावाने प्रसिद्ध असणारी कोएना मित्रा दीर्घकाळापासून कोणत्या चित्रपटात दिसली नाही आहे. तिने रिअॅलिटी शो बिग बॉस मध्ये एंट्री घेऊन पुन्हा प्रसिद्धी मिळवली होती. मात्र यानंतरही तिच्या करिअरसाठी असा विशेष फायदा झाला नाही. मात्र तिचे सोशल मीडियावर फॉलोअर्स जरूर वाढले आहेत.

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 17, 2020, 1:16 PM IST

ताज्या बातम्या