मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Queen Elizabeth 2 आणि शाही कुटुंबावर आधारित आहेत हे चित्रपट आणि वेबसीरिज, एकदा तरी नक्की पाहा

Queen Elizabeth 2 आणि शाही कुटुंबावर आधारित आहेत हे चित्रपट आणि वेबसीरिज, एकदा तरी नक्की पाहा

 ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी वयाच्या 96 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या.

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी वयाच्या 96 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या.

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी वयाच्या 96 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 9 सप्टेंबर- ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी वयाच्या 96 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्या पश्चात त्यांचा 72 वर्षांचा लेक प्रिन्स चार्ल्स आता ब्रिटनचा राजा होणार आहे. राणी एलिझाबेथ यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाहीय. परंतु तुम्हाला माहितेय का राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या आयुष्यावर आधारित अनेक चित्रपट आणि वेबसीरिजची निर्मिती करण्यात आली होती.

महाराणी एलिझाबेथ द्वितीय या सध्या स्कॉटलंडच्या बालमोरल कॅस्टलमध्ये वास्तवास होत्या. त्यांचा जन्म 1926 मध्ये झाला होता. त्या 96वर्षांच्या होत्या. एलिझाबेथ द्वितीय या ब्रिटनमध्ये सर्वात जास्तकाळ सत्तेवर असणाऱ्या महाराणी होत्या. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. शाही कुटुंबाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, त्यांना एपिसोडिक मॉबिलिटीचा त्रास होता. त्यांना उभं राहण्यात आणि चालण्यास अडचण होत होती. त्यांना जानेवारीमध्ये कोरोनादेखील झाला होता. आज आपण त्यांच्यावर आधारित चित्रपट आणि वेबसीरिजवर एक नजर टाकणार आहोत.

1) द क्राऊन- ब्रिटनच्या शाही कुटुंबावर आधारित ही वेबसीरिज नेटफ्लिक्स वर पाहायला मिळाली होती. यामध्ये 1947 च्या वर्ल्ड वार 2 नंतरची कथा दाखवण्यात आली आहे. तसेच यामध्ये महाराणी एलिझाबेथच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सविस्तरपणे दाखवण्यात आल्या आहेत.

2) द क्वीन- हा चित्रपट 2006 मध्ये आला होता. यामध्ये अभिनेत्री हेलन मिरेन यांनी महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची भूमिका साकारली होती. महाराणी डायनाच्या मृत्यूनंतर शाही कुटुंबात कोणकोणत्या घडामोडी घडल्या हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

3) जॉनी इंग्लिश रिबॉर्न- हा 2011 मध्ये आलेला एक ब्रिटिश जासूसवर आधारित कॉमेडी चित्रपट होता. हा चित्रपट पूर्णपणे महाराणीवर आधारित नव्हता. परंतु यामध्ये त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टींचा उल्लेख करण्यात आला होता.

4)द रॉयल नाईट आउट- हा चित्रपट 2015  मध्ये प्रदर्शित झाला होता. हासुद्धा एक कॉमेडी चित्रपट होता.

(हे वाचा:महाकाल मंदिरात विरोधानंतर रणबीर पोहोचला लालबागच्या राजाच्या चरणी; समोर आला VIDEO )

5)द रॉयल हाऊस ऑफ विंडसर- 2017 मध्ये आलेली ही एक डॉक्युमेंट्री फिल्म होती. यामध्ये शाही कुटुंबाबत माहिती देण्यात आली होती. तसेच यामध्ये महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या आयुष्यातील काही गोष्टींचाही उल्लेख करण्यात आला होता.

6)83- भारतीय क्रिकेटवर आधारित रणवीर सिंहच्या या चित्रपटात महाराणी एलिझाबेथचीही झलक दाखवण्यात आली आहे.

First published:

Tags: Elizabeth II, Entertainment