Pushpa 'झुकेगा नही'! मोठी रक्कम मिळत असूनही Allu Arjun ने रिजेक्ट केली तंबाखू ब्रँडची ऑफर
Pushpa 'झुकेगा नही'! मोठी रक्कम मिळत असूनही Allu Arjun ने रिजेक्ट केली तंबाखू ब्रँडची ऑफर
allu arjun pushpa
पुष्पा: द राइज (Pushpa: The Rise) या सिनेमामुळे जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्यानंतर पुष्पा स्टार अल्लु अर्जुनने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. यावेळी अभिनेता त्याच्या एखाद्या चित्रपटामुळे नाही तर एक जाहिरात मोठी रक्कम मिळत असूनही नाकारल्याने चर्चेत आला आहे.
मुंबई, 20 एप्रिल: पुष्पा: द राइज (Pushpa: The Rise) या सिनेमामुळे जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्यानंतर पुष्पा स्टार अल्लु अर्जुनने (Allu Arjun Latest News) पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. यावेळी अभिनेता त्याच्या एखाद्या चित्रपटामुळे नाही तर एक जाहिरात मोठी रक्कम मिळत असूनही नाकारल्याने चर्चेत आला आहे. पिंकविलाच्या वृत्तानुसार एका तंबाखू-पान मसालाच्या ब्रँडने (Allu Arjun Rejected Tobacco Endorsement) मोठी रक्कम ऑफर अल्लू अर्जुनला जाहिरातीबाबत विचारले होते. दरम्यान तातडीने अल्लू अर्जुनने ही ऑफर नाकारली. रिपोर्ट्सनुसार त्याने ही ऑफर नाकारली कारण त्याला त्याच्या चाहत्यांनी ही जाहिरात बघावी आणि त्या पदार्थाचे सेवन त्यांनी करावे असे वाटत नव्हते. कारण कालांतराने त्याचे व्यसन लागते.
'अल्लू अर्जुनला तंबाखूच्या ब्रँडच्या जाहिरातीसाठी मोठी रक्कम मिळाली होती, परंतु तो स्वत: वापरत नसल्यामुळे त्याने क्षणाचा विचार न करता ही ऑफर नाकारली', अशी माहिती या मनोरंजन पोर्टलने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. चित्रपटांमध्ये काही भूमिकांसाठी त्याला स्मोकिंग करावे लागते, त्याविषयी बोलताना या सूत्राने अशी प्रतिक्रिया दिली की, 'चित्रपटांमध्ये धूम्रपान करणे ही त्याच्या नियंत्रणात नसलेली गोष्ट आहे, तरी जेव्हा शक्य असेल तेव्हा त्याने अशा उपभोगाच्या कल्पनेच्या विरोधात असल्याचा मेसेज नेहमी दिला आहे.' अल्लू अर्जुनच्या मते तो या गोष्टीचे सेवन करत नाही तर ती तो प्रमोट तरी का करेल?
मोठमोठे बॉलिवूड स्टार करतायंत अशा जाहिराती
अनेक बॉलिवूड स्टार पान मसालाची जाहिरात करताना दिसतात. अगदी अजय देवगण, शाहरुख खान आणि आता अक्षय कुमारही अशाप्रकारच्या जाहिरातींमध्ये दिसतो आहे. अक्षय कुमारला यावरुन ट्रोल देखील करण्यात आले आहे. कारण त्याने आधी काही मुलाखतींमध्ये त्याने म्हटले होते की, गुटखा कंपन्या त्याला कोट्यवधींची ऑफर देत आहेत पण तो या ऑफर्स स्विकारणार नाही. बॉलिवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन देखील पान मसाला प्रोडक्ट प्रमोट केल्याने ट्रोलिंगचे शिकार झाले होते. तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार महेश बाबू देखील अशा जाहिरातीमध्ये ट्रोल झाला होता.
Published by:Janhavi Bhatkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.