जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Surinder Shinda Death : 15 दिवसांआधी उडाल्या होत्या मृत्यूच्या अफवा; प्रसिद्ध गायकाने अखेर आज घेतला अखेरचा श्वास

Surinder Shinda Death : 15 दिवसांआधी उडाल्या होत्या मृत्यूच्या अफवा; प्रसिद्ध गायकाने अखेर आज घेतला अखेरचा श्वास

 पंजाबी सिंगर सुरिंदर शिंदा

पंजाबी सिंगर सुरिंदर शिंदा

प्रकृतीमध्ये कोणतीच सुधारणा होऊ शकली नाही. अखेर त्यांना व्हेटिंलेटरवर शिफ्ट करावं लागलं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 26 जुलै:  प्रसिद्ध पंजाबी सिंगर सुरिंदर शिंदा यांचं निधन झालं आहे. 26 जुलै रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 64 वर्षांचे होते. मागील दोन आठवड्यांहून अधिक काळ ते रूग्णायलात होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. शेवटच्या दिवसात त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर बुधवारी सकाळी 7.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला. पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये त्यांनी खूप मोलाचं योगदान दिलं होतं. ‘ट्रक बिलिया’, ‘पुत्त जट्टान दे’ सारखी अनेक हिट गाणी त्यांनी गायली होती. त्यांच्या निधानानं पंजाबी इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सुरिंदर शिंदा यांचं DBM रुग्णालयात निधन झालं. मागील 20 दिवसांपासून ते रुग्णालयात होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते पण त्यांच्या प्रकृतीमध्ये कोणतीच सुधारणा होऊ शकली नाही. अखेर त्यांना व्हेटिंलेटरवर शिफ्ट करावं लागलं आणि तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हेही वाचा -  कल्की कोचलिनला ‘या’ कारणामुळे समजलं जायचं ड्रग पेडलर; केली होती घाणेरडी मागणी 14 दिवसांआधीच सुरिंदर शिंदा यांच्या निधनाची अफवा पसरवण्यात आली होती. तेव्हा त्यांच्या मुलाने फेसबुक लाइव्ह करत ते सुखरूप असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं सांगितलं होतं. त्यांच्या निधनाच्या बातम्या खोट्या असल्याचा खुलासा त्यांनी केला होता.

News18लोकमत
News18लोकमत

सुरिंदर शिंदा यांच्यावर एक महिन्याआधी एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या शरिरात इन्फेक्शन वाढल्याचं म्हटलं जातंय. शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवत होती आणि शरिरातील इन्फेक्शन वाढत होतं. सुरिंदर शिंदा यांचं खरं नाव पाल धम्मी असं होतं.   ‘पुत्त जट्टन दे’, ‘जट जियोना मोर’, ‘ट्रक बिलिया’, ‘बलबीरो भाभी’ आणि ‘काहर सिंह दी’ ही त्यांची काही प्रसिद्ध गाणी आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात