मुंबई, 21 जुलै: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांच्याविरोधात पॉर्नोग्राफीची (Raj Kundra Pornography Case) केस समोर आली आहे. राज कुंद्राला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हे एकंदरीत सर्व प्रकरणे फेब्रुवारी 2021 मध्ये समोर आलं होतं. आवश्यक पुरावे जमा झाल्यानंतर पोलिसांनी राज कुंद्राला अटक (Raj Kundra Arrested) केली आहे. मंगळवारी या प्रकरणी आरोपी राज कुंद्राला मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. ज्याठिकाणी पोलिसांची मागणी स्विकारत आरोपी राज कुंद्राला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज कुंद्राला भायखळा जेलमध्ये हलवण्यात आलं आहे. दरम्यान या प्रकरणी शिल्पा शेट्टीची भूमिका पोलिसांनी स्पष्ट केली आहे.
फेब्रुवारी 2021 पासून या प्रकरणी शोध घेतला जात होता, पुरावे गोळा केले जात होते. सहा महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांनी राज कुंद्राला अटक केली आहे. मंगळवारी मुंबई पोलिसांनी जॉइंट कमिश्नर मिलिंद भरांबे यांनी पत्रकार परिषदेमध्ये काही महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी या प्रकरणात कशाप्रकारे काम चालत होतं, तसंच शिल्पा शेट्टीची यात काय भूमिका आहे हे स्पष्ट केलं.
हे वाचा-पतीच्या अटकेनंतर शिल्पाने केलं हे काम; अश्लील चित्रफीत प्रकरणी राज कुंद्रा अटकेत
शिल्पाविरोधात कोणताही पुरावा नाही
शिल्पा शेट्टीची या प्रकरणात सक्रीय भूमिका असल्याचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याची माहिती त्यांनी दिली. आम्ही तपास करत आहोत. आम्ही पीडितांना अशी विनंती करतो की त्यांनी पुढे येत क्राइम ब्रँचशी संपर्क करावा, आम्ही अवश्य कारवाई करू, असंही ते म्हणाले
हे वाचा-पूनम पांडेने राज कुंद्रावर केले होते गंभीर आरोप; हा VIDEO होतोय VIRAL
पुराव्यांच्या आधारे झाली कारवाई
जॉइंट सीपींनी अशी माहिती दिली की उमेश कामत सारख्या निर्मात्याला अटक करण्यात आली आहे. कामत राज कुंद्राच्या भारतातील ऑपरेशन्सची देखरेख करत असे. हॉटशॉट्स अॅपचं कामकाज वियान कंपनीच्या माध्यमातून पाहिलं जात असे. जेव्हा रेड टाकण्यात आली तेव्हा राज कुंद्राविरोधात मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे त्याला अटक करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Raj kundra, Shilpa shetty