मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Nitin Manmohan : सलमानच्या चित्रपटाचे निर्माते नितीन मनमोहनला हृदयविकाराचा झटका; प्रकृती चिंताजनक

Nitin Manmohan : सलमानच्या चित्रपटाचे निर्माते नितीन मनमोहनला हृदयविकाराचा झटका; प्रकृती चिंताजनक

नितीन मनमोहन

नितीन मनमोहन

बॉलिवूडमधील दिग्गज निर्माते नितीन मनमोहन त्यांच्या कामामुळे कायम चर्चेत असतात. अशातच ते पुन्हा एकदा चर्चेत आले असून यावेळी ते एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 5 डिसेंबर : बॉलिवूडमधील दिग्गज निर्माते नितीन मनमोहन त्यांच्या कामामुळे कायम चर्चेत असतात. अशातच ते पुन्हा एकदा चर्चेत आले असून यावेळी ते एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. नितीन मनमोहन यांच्या प्रकृतीबाबत एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. नितीन मनमोहनला हृद्यविकाराचा झटका आला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती चिंतानजन असून चाहते ते बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

नितीन मनमोहन यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती नाजूक असल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. सध्या ते कोकिलाबेन धीरुबाई रुग्णालयात दाखल आहेत.  अंबानी त्यांना 4 डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे चाहत्यांचीही  चिंता वाढली.

हेही वाचा -  lucky Ali : प्रसिद्ध गायकाच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण; फेसबुक पोस्टद्वारे केलं मदतीचं आवाहन

नितीन मनमोहन हे दोन दिवसांपासून रुग्णालयात आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी विचारले असता डॉक्टरांनी सांगितलं, औषधोपचार सुरु आहेत मात्र त्यांत्या प्रकृती काही खास सुधारणा नाहीये. नितीन यांची प्रकृती खालावल्याने त्यांचे कुटुंबीय प्रचंड अस्वस्थ आहेत. निर्मात्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी चाहतेही शुभेच्छा देत आहेत. नितीन यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समजताच अभिनेता अक्षय खन्ना त्याला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचला. अक्षयने नितीनच्या 'सब कुशल मंगल' सारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.

दरम्यान, नितीन मनमोहन हे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते मनमोहन यांचा मुलगा आहे. मनमोहन 'ब्रह्मचारी', 'गुमनाम' आणि 'नया जमाना' या चित्रपटांसाठी ओळखले जातात. इंडस्ट्रीतील लोक नितीनला वडिलांची सावली म्हणतात. नितीन एक निर्माता असण्यासोबतच एक चांगले अभिनेते देखील आहे. दूरदर्शनच्या भारत के शहीद या टीव्ही मालिकेत चंद्रशेखर आझादची भूमिका साकारताना ते अखेरचे दिसले होते. त्यांनी सलमानच्या रेड्डी चित्रपटाचीही निर्मीती केली होती.

First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment, Health, Producer