मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

lucky Ali : प्रसिद्ध गायकाच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण; फेसबुक पोस्टद्वारे केलं मदतीचं आवाहन

lucky Ali : प्रसिद्ध गायकाच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण; फेसबुक पोस्टद्वारे केलं मदतीचं आवाहन

लकी अली

लकी अली

90 च्या दशकातील लोकप्रिय गायक लकी अली यांना बॉलिवूडचे सिंगिंग सेन्सेशन म्हणूनही ओळखलं जातं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 5 डिसेंबर : 90 च्या दशकातील लोकप्रिय गायक लकी अली यांना बॉलिवूडचे सिंगिंग सेन्सेशन म्हणूनही ओळखलं जातं. त्यांच्या काळात त्यांनी पॉप संस्कृतीला बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान मिळवून दिलं होतं. आजकाल सिंगर पुन्हा एकदा चर्चेत आहे, पण यावेळी त्याच्या कोणत्याही गाण्यामुळे नाही तर सिंगर सध्या अडचणीतून जात आहे. लकी अली अडचणींत असून त्यांनी पोलिसांना मदतीची विनंती केली आहे. सध्या त्यांच्याविषयी सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

लकी अलीने फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये गायकाने लिहिले, काही लोक माझ्या जमिनीवर जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. मी कर्नाटकच्या डीजीपींना पत्र लिहिलं. पत्रामध्ये तक्रार करत लिहिलं, 'सर, माझं नाव मकसूद महमूद अली आहे. मी दिवंगत अभिनेता आणि कॉमेडियन मेहमूद अली यांचा मुलगा आहे आणि लकी अली या नावाने ओळखला जातो. मी सध्या कामासाठी दुबईत आहे त्यामुळे तुमच्या मदतीची गरज आहे. माझ्या शेतात, जी ट्रस्टची मालमत्ता आहे आणि केंचनहल्ली येलाहंका येथे आहे. बेंगळुरूच्या भूमाफिया, सुधीर रेड्डी आणि मधु रेड्डी यांनी बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे.

लकी अली यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिलं, रोहिणी सिंधूरी असं नाव असलेल्या आयएएस अधिकाऱ्याच्या मदतीने त्यांनी हे काम केलं आहे. रोहिणी सिंधूरी या स्वतःच्या फायद्यासाठी राज्यातील सुविधांचा गैरवापर करत आहेत. ते लोक जबरदस्तीने माझ्या शेतात घुसले असून आवश्यक कागदपत्रे दाखवण्यास नकार देत आहेत.

लकी अली यांनी या पोस्टमध्ये असेही लिहिले आहे की, ते गेल्या 50 वर्षांपासून या भूमीवर राहत आहेत. माझे कुटुंब आणि लहान मुले एकटे आहेत. स्थानिक पोलिसांकडून मला कोणतीही मदत मिळत नाही. जे प्रत्यक्षात अतिक्रमण करणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. 7 डिसेंबर रोजी होणार्‍या अंतिम सुनावणीपूर्वी खोटा ताबा सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार्‍यांची ही बेकायदेशीर कृती थांबवण्यासाठी मी तुमची मदत घेतो. कृपया आम्हाला मदत करा.

First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment, Singer