मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

HBD: 'या' प्रसिद्ध क्रिकेटरने रणवीरला कोचिंग देण्यास दिला होता नकार

HBD: 'या' प्रसिद्ध क्रिकेटरने रणवीरला कोचिंग देण्यास दिला होता नकार

अभिनेता रणवीर सिंगचा जन्म 6 जुलै 1985 मध्ये मुंबई येथे झाला होता.

अभिनेता रणवीर सिंगचा जन्म 6 जुलै 1985 मध्ये मुंबई येथे झाला होता.

अभिनेता रणवीर सिंगचा जन्म 6 जुलै 1985 मध्ये मुंबई येथे झाला होता.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 6 जुलै-  बॉलिवूडचा(Bollywood) अतरंगी अभिनेता म्हणून अभिनेता रणवीर सिंगला(Ranvir Singh) ओळखलं जात. रणवीरने खूपच कमी वयात मोठी लोकप्रियता मिळवली आहे. कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नसतानादेखील केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यानं हे यश खेचून आणलं आहे. रणवीर आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी अफाट कष्ट घेतो,हे आपण सर्वचजण जाणतो. मात्र फारच कमी लोकांना माहिती आहे, की रणवीरला क्रिकेटची आवड होती. आणि त्याला एका प्रसिद्ध क्रिकेटरने क्रिकेटचे धडे देण्यास नकार दिला होता. आज रणवीर सिंग आपला 35 वा वाढदिवस(35 Birthday) साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया काय होता हा किस्सा.
अभिनेता रणवीर सिंगचा जन्म 6 जुलै 1985 मध्ये मुंबई येथे झाला होता. रणवीर सिंगला नेहमीच एक अभिनेता व्हायचं होतं. मात्र कॉलेजच्या दिवसांमध्ये त्याला अभिनय फारच लांबची गोष्ट वाटू लागली होती. त्यामुळे त्याने लिखानाकडे आपलं मन वळवलं होतं. मात्र आज आपण त्याच्या शालेय जीवनामधील एक किस्सा जाणून घेणार आहोत. ज्यावेळी रणवीर शाळेत होता. तेव्हा त्याला क्रिकेट खेळण्याची आवड होती. आणि तो ‘गिल्स शिल्ड’ खेळण्यासाठी खुपचं उत्सुक होता. मात्र प्रसिद्ध क्रिकेटर मोहिंदर अमरनाथने त्याला कोचिंग देण्यास नकार दिला होता. कारण तो सरावासाठी उशिरा पोहोचला होता. (हे वाचा:HBD Ranveer Singh: नोकरी करणारा अभिनेता कसा झाला बॉलिवूडचा बाजीराव?  ) आज अभिनेता रणवीर सिंगने बॉलिवूडवर आपली एक पकड निर्माण केली आहे. आपल्या खणखणीत अभिनयाच्या जोरावर अनेक मोठमोठे चित्रपट आपल्या पदरात पाडून घेतले आहेत. रणवीरने ‘बँड बाजा बारात’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यामध्ये तिची अभिनेत्री म्हणून अनुष्का शर्मा होती. आपल्या पहिल्याच चित्रपटातून रणवीर चाहत्यांच्या मनावर आपली एक खास छाप पाडली होती. रणवीरने बाजीराव मस्तानी, पद्मावत, रामलीला, गली बॉय, बेफिक्रे अशा कित्येक हिट चित्रपटांत काम केलं आहे. अशा या हरहुन्नरी कलाकाराला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
First published:

Tags: Bollywood actor, Ranvir singh

पुढील बातम्या