जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / प्रियंका चोप्राचा पती निक जोनस जखमी, शोच्या शुटिंग दरम्यान झाली दुखापत

प्रियंका चोप्राचा पती निक जोनस जखमी, शोच्या शुटिंग दरम्यान झाली दुखापत

प्रियंका चोप्राचा पती निक जोनस जखमी, शोच्या शुटिंग दरम्यान झाली दुखापत

निक सध्या एका टिव्ही शो साठी चित्रिकरण करत आहेत. लॉसएन्जेलीस (Los Angeles) मध्ये ‘द वॉइस’ (The Voice) या शो साठी तो चित्रिकरण होता. या दरम्यानचं त्याला दुखापत झाली होती

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 17 मे :  अभिनेत्री प्रियंका चोप्राचा (Priyanka Chopra) पती आणि गायक निक जोनस (Nick Jonas) जखमी झाल्याची बातमी आली होती. एका शो च्या चित्रिकरणादरम्यान त्याला ही दुखापत झाल्याचं समजत आहे. शनिवारी ही दुखापत झाली होती. त्यानंतर निकला दवाखान्यात भरती करण्यात आलं होतं. (Nick Jonas injured) निक सध्या एका टिव्ही शो साठी चित्रिकरण करत आहेत. एक सिंगींग शो तो करत आहे. लॉसएन्जेलेस (Los Angeles)  मध्ये ‘द वॉइस’ (The Voice) या शो साठी तो चित्रिकरण होता. या दरम्यानचं त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर लगेट त्याला अॅम्ब्युलन्स मधून दवाखान्यात नेण्यात आलं. तर आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचही डॉक्टर्सने सांगितलं आहे. तर नुकताच त्याला डिस्चार्ज ही मिळाला असल्याचं वृत्त समोर आलं होत.

जाहिरात

दरम्यान प्रियंका ही लॉसएन्जेलीसमध्ये नाही. तर ती लंडन (London) मध्ये आहे. तिच्या अनेक प्रोजेक्ट्सच शुटींग हे सध्या लंडन मध्येच सुरू आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून ती तिथेच आहे. तर निक त्याच्या शोसाठी लॉसएन्जेलेसमध्ये आहे. नुकताच निकचा अल्बम स्पेसमॅन लाँच झाला होता. तो फार चर्चेत देखिल होता.

होता आशियातील सर्वात Sexy Man; पाहा हर्षद चोपडा सध्या काय करतोय?

प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांचे जगभरात असंख्य फॅन आहेत. त्यामुळे निकच्या दुखापतीची बातमी समजताच त्यांच्या चाहत्यामंध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होत. पण आता निक ठिक असल्याचं समजतं आहे. तर डॉक्टर्सनी त्याला डिस्चार्ज देऊन आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

प्रियंका आणि निक हे बॉलिवूड तसेच हॉलवूडचं ही एक प्रसिद्ध कपल आहे. त्यांची केमिस्ट्री ही त्यांच्या जगभरातील चाहत्यांना फार आवडते. 2018 मध्ये प्रियंका आणि निक यांचा विवाह झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात