अभिनेत्री ऐश्वर्या रायची मुलगी आराध्या आता 8 वर्षांची झाली आहे. त्यानंतर आता जवळपास 8 वर्षांनंतर ऐश्वर्याच्या डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
लग्नाप्रमाणेच ऐश्वर्याच्या डोहाळे जेवणाचे फोटो त्यावेळी कुठेही बाहेर जाऊ दिले गेले नव्हते. अत्यंत खासगी स्वरुपाचा हा कार्यक्रम होता.
यावेळी अभिषेक आणि ऐश्वर्यानं मेहंदी ग्रीन कलरचे आउटफिट्स घातले होते. ऐश्वर्या साडीमध्ये खूपच सुदर दिसत होती.
या फोटोमध्ये ऐश्वर्या जया बच्चन आणि अमिताभ यांना नमस्कार करताना दिसत आहे. 2007 मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकचं लग्न हे त्या वर्षातील शाही लग्नापैकी एक होतं.
ऐश्वर्याच्या डोहाळे जेवणाचे हे थ्रोबॅक फोटो तिच्या चाहत्यासाठी खूप खास आहेत. हा कार्यक्रम त्यावेळी अत्यंत खासगी पद्धतीन आटोपल्यानं हे फोटो त्यावेळी हे फोटो समोर आले नव्हते.