नवी दिल्ली, 21 जानेवारी : बॉलिवूड(Bollywood) अभिनेत्री प्रियांका चोप्रा(Priyanka Chopra) सध्या हॉलीवूडमध्ये(Hollywood) काम करत आहे. अनेक वर्ष बॉलिवूडवर राज्य केल्यानंतर मागील काही वर्षांपासून प्रियांका हॉलिवूडमध्ये देखील खूप लोकप्रिय झाली आहे. अनेकदा भारतीय कलाकारांना परदेशात वर्णभेद (Racism)) सहन करावा लागतो. प्रियांका चोप्राच्या (Priyanka Chopra) बाबतीत देखील ही घटना घडली असून नुकताच तिने याबाबतीत खुलासा केला आहे. अमेरिकेमध्ये माध्यमिक शिक्षण घेत असताना तिला वर्णभेदाचा फटका सहन करावा लागल्याचे तिने नुकतेच म्हटले आहे. एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने हा खुलासा केला असून अनेक नावांनी तिला चिडवले जात असे.
पीपल मॅगझीनला (People Magzine) दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रियांका चोप्रा हिने याबाबतीत खुलासा केला आहे. 'Unfinished' या आपल्या स्मरणिकेविषयी बोलण्यासाठी ती या मुलाखतीमध्ये आली होती. वयाच्या 13 व्या वर्षी प्रियांका आपले माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेली होती. मॅसेच्युसेट्स, लोवा आणि न्यूयॉर्क शहरात शिक्षण घेत होती. परंतु या ठिकाणी तिला दक्षिण आशियायी असल्याने ब्राउनी आणि करी नावाने चिडवले जाई. याचबरोबर अनुवांशिक शिव्या देखील दिल्या जात असतं. वयाच्या 15 व्या वर्षी तिला 'तू ज्या हत्तीवर आलीस त्या हत्तीवर परत जा' असं सांगण्यात आलं. 'Unfinished' या स्मरणिकेत तिने हे अनुभव सांगितले आहेत. या सर्व गोष्टीचा परिणाम म्हणजे तिचा कॉन्फिडन्स कमी झाला. मी कुठे आहे आणि कोण आहे याचा अनेकदा विचार माझ्या मनात येत असे.
हे देखील वाचा - कतरीना कैफची बहीण इसाबेलही येणार सिनेमात; या अभिनेत्यासोबत करणार बॉलिवूड डेब्यू
पुढे बोलताना ती म्हणाली की, ती ज्या शहरांमध्ये राहत होती त्या शहरांना ती दोष देत नाही, पण तिच्या मनाला दुःख वाटेल असे बोलणाऱ्या व्यक्तींचे खूप वाईट वाटते. ती पुढे म्हणाली की, तिने हा अनुभव वैयक्तिकरित्या घेतला. यामधून बाहेर पाडण्यासाठी तिने आपल्या जवळच्या मित्रांची आणि समुपदेशकाची मदत घेतल्याचं देखील सांगितलं. भारतात परतल्यानंतर मला खूप चांगलं वाटल्याचे पुढे प्रियंकाने म्हटले. भारतात परतल्यानंतर मला खूप प्रेम आणि स्नेह मिळाला. माझ्यासाठी हा अनुभव खूपच वेगळा असल्याचे देखील तिने म्हटले. मी अमेरिकेत खूप काही वेगळे करण्याचा प्रयत्न करत नव्हते. त्यामध्ये बसण्याचा प्रयत्न करत होते. परंतु भारतात परतल्यानंतर मी वेगळे होण्याचा प्रयत्न केल्याचे देखील तिने यावेळी बोलताना सांगितले.
दरम्यान सध्या प्रियांका तिच्या आगामी व्हाईट टायगर (White Tiger) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिने पिंकी मॅडम ही भूमिका साकारली असून निर्माती म्हणून देखील या चित्रपटामधे तिचा भाग आहे. नुकतेच तिने लंडनमध्ये टेक्स्ट फॉर यू (Text For You) चे शूटिंग पूर्ण केलं असून रुसो ब्रदर्सच्या सिटाडेल आणि द मॅट्रिक्स 4 मध्ये देखील ती दिसणार आहे. ‘द व्हाइट टायगर’ या बॉलिवूड चित्रपटात देखील दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर राजकुमार राव(Rajkumar Rao) दिसणार आहे. अरविंद आदिगाच्या कादंबरीवर हा चित्रपट आधारित असून कोरोनाच्या (Covid19) या संकटामुळं हा चित्रपट देखील ऑनलाईन रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्सवर(Netflix) 22 जानेवारीला रिलीज होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Priyanka chopra, Racism, Rajkumar rao