मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

प्रियांका चोप्राला भेटण्यासाठी तासन् तास वाट पाहायचा सहावीत शिकणारा मुलगा? देसी गर्लने सांगितला किस्सा

प्रियांका चोप्राला भेटण्यासाठी तासन् तास वाट पाहायचा सहावीत शिकणारा मुलगा? देसी गर्लने सांगितला किस्सा

सेलेब्स म्हटलं की चाहते आलेच. प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra)    देखील तिच्या एका चिमुकल्या चाहत्याच्या भेटीचा भन्नाट किस्सा सांगितला आहे.

सेलेब्स म्हटलं की चाहते आलेच. प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) देखील तिच्या एका चिमुकल्या चाहत्याच्या भेटीचा भन्नाट किस्सा सांगितला आहे.

सेलेब्स म्हटलं की चाहते आलेच. प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) देखील तिच्या एका चिमुकल्या चाहत्याच्या भेटीचा भन्नाट किस्सा सांगितला आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 23 डिसेंबर -प्रियांका चोप्रा(Priyanka Chopra) सध्या तिच्या 'द मॅट्रिक्स रिसर्क्शन्स' (The Matrix Resurrections) या हॉलिवूड चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील तिच्या कामाला पसंती दिली जात आहे. प्रियांका चोप्राचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत. अलीकडेच, तिच्या एका मुलाखतीत प्रियांकाने तिच्या एका छोट्या चाहत्याचा एक मनोरंजक किस्सा सांगितला. प्रियांकाने सांगितले की, जेव्हा ती मुंबईत राहत होती, तेव्हा पाचवी किंवा सहावीत शिकणारा एका लहनगा तिच्या घराबाहेर तासनतास उभी असायचा.

लहान फॅन शाळेतून येत असे भेटायला

ग्रेजिया यूके Grazia UK ला दिलेल्या मुलाखतीत प्रियंका चोप्राला तिच्या चाहत्याविषयी एकादा किस्सा सांगण्यास सांगितले होते. यावेळी ती म्हणाली हा किस्सा काहीसा वेगळा आहे. 'मला एका चाहत्यासोबत असा अनुभव आला आहे, जो मला विचित्र आणि भीतीदायक वाटतो.' प्रियांकाने त्या चाहत्याची संपूर्ण कहाणी सांगितली.प्रियंका म्हणाली, 'मी जेव्हा मुंबईत राहायचे तेव्हा एक लहान शाळकरी मुलगा होत. तो सहाव्या वर्गात असावा. तो दर वीकेंडला शाळेत काहीतरी कारण सांगून बाहेर पडत असे. घरताल्यांना सांगत मित्राला भेटायला जातोय असं सांगत असे. शाळेत सांगत घऱच्यांना भेटायला जात आहे. असं काहीही कारण सांगून तो मला भेटण्यासाठी येत असे. तो ही कारण सांगून माझ्या अपार्टमेंटच्या बाहेर उभा असायचा.

वाचा-पनामा पेपर्स चौकशीनंतर ऐश्वर्या रायची पहिली पोस्ट, पती अभिषेकने केली कमेंट

जेव्हा प्रियांकाने चिमुकल्या चाहत्याशी साधला संवाद

प्रियांका तिच्या मुलाखतीत पुढे म्हणाली, 'तो मुलगा माझ्या अपार्टमेंटबाहेर 3-4 तास माझी कार येण्याची वाट पाहत उभा असायचा. मग एके दिवशी गार्डने सांगितले की, एक मूल गेल्या तीन-चार वीकेंड्सपासून अपार्टमेंटच्या बाहेर उभे आहे. तेव्हा मला हे कळले. मग एक दिवस मी घरी असताना मी त्याला माझ्याकडे बोलावले आणि त्याच्याशी बोललो.

वाचा-Tiger 3 मध्ये कतरिनाला टक्कर देणार ही अभिनेत्री? ऋतिकसोबत केलंय काम

माझ्यासोबत त्याला फिरायचे होते

अभिनेत्री पुढे म्हणाली, 'खरं तर ते लहान मूल मला आवडायचं. मी त्याच्याबरोबर बाहेर जावे अशी त्याची इच्छा होती. मला प्रवास करायला आवडते हे माझ्या चित्रपटातून किंवा मुलाखतींवरून त्याला कळले. म्हणूनच त्याची ती इच्छा होती. मी याबद्दल एका मित्राशी बोललो आणि मग मी त्याच्या कुटुंबाला फोन केला की तो येथे सुरक्षित आहे आणि आम्ही त्याला शाळेत परत पाठवले. मी काही वर्षे त्या मुलाच्या संपर्कात होतो. त्यात मला कसलाच वेडेपणा वाटला नव्हता.

जोनास आडनाव हटवल्यानंतर झालेल्या गदारोळानंतर प्रियांका चोप्राने या प्रकरणावर मौन सोडले आहे. ई-टाइम्सशी झालेल्या संवादात प्रियांकाने यामागचे कारण सांगितले. 'देसी गर्ल'ने सांगितले की, तिने हे केले कारण तिला इन्स्टा युजरनेम ट्विटर युजरनेमशी जुळवायचे होते. त्यामुळे तिनं जोनास आडनाव काढून टाकले.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Priyanka chopra