मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Panama Papers Leak Case चौकशीनंतर ऐश्वर्या रायची पहिली पोस्ट चर्चेत; पती अभिषेक बच्चनने केली कमेंट

Panama Papers Leak Case चौकशीनंतर ऐश्वर्या रायची पहिली पोस्ट चर्चेत; पती अभिषेक बच्चनने केली कमेंट

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) सध्या 'पनामा पेपर्स लीक' (Panama Papers Leak Case) प्रकरणी तिच्या चौकशीमुळे चर्चेत आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) सध्या 'पनामा पेपर्स लीक' (Panama Papers Leak Case) प्रकरणी तिच्या चौकशीमुळे चर्चेत आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) सध्या 'पनामा पेपर्स लीक' (Panama Papers Leak Case) प्रकरणी तिच्या चौकशीमुळे चर्चेत आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 23 डिसेंबर -अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) सध्या 'पनामा पेपर्स लीक' (Panama Papers Leak Case) प्रकरणी तिच्या चौकशीमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री सोमवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर दिल्लीत हजर झाली होती. यानंतर ऐश्वर्या रायने पहिल्यांदाच सोशल मीडियावर थ्रोबॅक फोटो शेअर केला.हा फोटो तिची आई वृंदा राय ( Mother Vrinda Rai) आणि दिवंगत वडील कृष्णराज राय(Late Father Krishnaraj Rai) यांचा आहे. ऐश्वर्याने 52 व्या लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त त्यांच्या पालकांचा एक फोटो पोस्ट करून त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

ऐश्वर्याच्या पोस्टवर अभिषेकने केली कमेंट

ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या अधिकृत इन्स्टा अकाउंटवर (Aishwarya Rai Bacchan Official Instagram Account) तिच्या आई-वडिलांचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये दोघेही कॅमेऱ्याकडे पाहून हसताना दिसत आहेत. यासोबतच ऐश्वर्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे,“लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या प्रिय आई डोड्डा-डॅडी आजा..तुमच्यावर प्रेम करते आणि तुमच्या बिनशर्त प्रेम आणि आशिर्वादासाठी खूप खूप धन्यवाद. नेहमीच फक्त प्रेम आणि प्रेम." अॅशच्या फॅन्ससोबतच सेलेब्सही या फोटोवर आपली प्रतिक्रिया देत आहेत. तसेच तिचा पती अभिषेक बच्चनने (Abhishek Bachchan) कमेंट बॉक्समध्ये हार्ट इमोजी पोस्ट केला आहे.

वडिलांच्या वाढदिवशीही केला होता फोटो शेअर

ऐश्वर्या राय बच्चनने 20 नोव्हेंबर 2021 रोजी तिच्या दिवंगत वडिलांचा एक फोटो शेअर केला होता. ज्यात तिने वडिलांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. फोटोसोबतच ऐश्वर्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, 'हॅपी बर्थडे माय डार्लिंग डॅडी-अज्जा. तुझ्यावरचे प्रेम कायम असेच राहणार." या पोस्टवर अभिषेक बच्चननेही कमेंट केली होती.

वाचा-Tiger 3 मध्ये कतरिनाला टक्कर देणार ही अभिनेत्री ? ऋतिकसोबत केलंय काम

वडिलांचे 2017 मध्ये झाले निधन

ऐश्वर्या रायचे वडील कृष्णा राज लष्करात जीवशास्त्रज्ञ होते. 2017 मध्ये मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वडिलांच्या निधनाने ऐश्वर्याला खूप दुःख झाले. ती प्रत्येक प्रसंगी त्यांची आठवण काढताना दिसते. तिच्या सोशल मीडिया हँडलवर थ्रोबॅक फोटो पोस्ट करत असते. यंदाच्या मदर्स डेच्या निमित्तानेही तिने तिच्या पालकांसोबतचे फोटो शेअर केले होते.

वाचा-'83' च्या प्रीमियरमध्ये ब्लॅक गाउनमध्ये दीपिकाचा जलवा; थोड्याच वेळात बदलला ड्रेस

ऐश्वर्या रायने 2007 मध्ये अभिषेक बच्चनशी लग्न केले. या जोडप्याला दहा वर्षांची मुलगी असून तिचे नाव आराध्या बच्चन आहे. गेल्या महिन्यात आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दोघेही मालदीवला गेली होती. तिच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, अॅश दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या 'पुनियन सेल्वम' या चित्रपटात दिसणार आहे.

.

First published:

Tags: Abhishek Bachchan, Aishwarya rai, Amitabh Bachchan, Bollywood News, Entertainment